यंदाही पायी वारी नाहीच! पालख्यांचं बसमधूनच होणार प्रस्थान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी असेल वारी सोहळ्याची नियमावली
यंदाही पायी वारी नाहीच! पालख्यांचं बसमधूनच होणार प्रस्थान

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळं गेल्यावर्षीप्रमाणं यंदाही पंढरपूर वारी सोहळ्यातील पालख्या या बसनेच नेण्यात येणार आहेत. राज्य शासनानं याबाबत आदेश काढला आहे. या आदेशानुसार गेल्यावर्षीप्रमाणंच वारीचं स्वरुप असणार आहे. नव्या आदेशानुसार केवळ वाखरी ते पंढरपूर दरम्यान दीड किमी अंतरच पायी वारी होणार आहे. (aashadhi vari will not going by walking this year the palkhis will leave by bus)

यंदाही पायी वारी नाहीच! पालख्यांचं बसमधूनच होणार प्रस्थान
"औरंगजेबाला बंद न पाडता आलेली वारी ठाकरे सरकारने बंद पाडली"

शासनानं वारीसाठी काढलेल्या सुधारित नियमावलीनुसार, मानाच्या दहा पालख्यांनाच या वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी यावर्षी देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळयांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पालखी किंवा दिंड्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याव्दारे आषाढीवारीमध्ये सहभागी होण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पालख्यांना विशेष वाहनांद्वारे वाखरी येथे जाण्यास परवानगी

प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी प्रातिनिधीक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकादशी दिवशीचा रथोत्सव असा असेल

रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने १० मानकरी व मंदिर समितीचे ५ कर्मचारी अशा १५ व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी प्रत्येक मानाच्या पालखीत ४० वारकऱ्यांना संताच्या पादुका भेटीची परवानगी देण्यात आली आहे.

वारकऱ्यांची किती असेल संख्या?

यावर्षी २ बस व प्रत्येक बसमध्ये २० याप्रमाणे ४० वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अभिप्रायानुसार मानाच्या पालखी सोहळ्यांना १ अधिक १० या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन किर्तनास परवानगी देण्यात आली आहे.

स्थानिक दिंडोकऱ्यांना मुखदर्शनास परवानगी

स्थानिक दिंडोकरी किंवा फडकरींना आषाढी एकादशी दिवशी (मंगळवार, २० जुलै २०२१) रोजी रूक्मिणीमातेचं मुखदर्शन देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांना वेळ व प्रवेशपत्रिका देण्याची व्यवस्था मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com