esakal | "औरंगजेबाला बंद न पाडता आलेली वारी ठाकरे सरकारने बंद पाडली"
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadhi-Vari

"औरंगजेबाला बंद न पाडता आलेली वारी ठाकरे सरकारने बंद पाडली"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाजपच्या माधव भांडारींची राज्य सरकारवर टीका

मुंबई: कोरोनाच्या संसर्गाच्या (Coronavirus) भीतीने यंदाच्या वर्षीदेखील आषाढी एकादशीनिमित्त असलेली पायी (Ashadhi Vari) वारी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी ठराविक लोकांच्या उपस्थितीत एसटी बसने दिंडी पंढपूरला (Pandharpur) जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. या मुद्द्यावरून भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. "महाराष्ट्राची जगभरात प्रसिद्ध असलेली आषाढी कार्तिकीची परंपरा गेल्या वर्षी कोरोनाच्या वातावरणामुळे रद्द झाली. या वर्षीही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली. मागच्या वर्षी परिस्थिती वेगळी होती, त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाला नागरिकांनी प्रतिसाद दिला होता. पण या वर्षीही ही वारीला परवानगी नाकारण्याची भूमिका घेण्यात आली. औरंगजेबालाही बंद न पाडता आलेली ही वारी ठाकरे सरकारने बंद पाडली", अशा शब्दात भांडारी यांनी राज्य सरकारवर टीका केली. (BJP Madhav Bhandari slam Uddhav Thackeray Mahavikas Aghadi over Ashadhi Pandharpur Vari)

हेही वाचा: ऑनलाइन वर्ग सुरु असताना शिक्षिकेकडेपाहून मुलाची अश्लील कृती

"कोरोना सध्या आटोक्यात आहे. प्रतिबंधक उपाययोजना करून वारी सुरू ठेवता येऊ शकते. लस घेऊन वारकऱ्यांना वारी करू द्या. निवडक लोकांना पायी वारीची परवानगी द्या. इतरही संरक्षण उपाययोजना करण्याची आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार वारी करण्याची तयारी वारकरी समुदायाने दाखवली आहे. आणखी काही बंधनं असतील तर ती सुचवा. पण पायी वारी बंद करू नका. वारीला परवानगी द्यावी हा एकट्या भाजपाचा विषय नाही. हा महाराष्ट्रातील नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी संख्येची मर्यादा व नियम घालून परवानगी द्यावी", अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा: धक्कादायक! मालाडमधल्या बेकरीत केकमधून ड्रग्ज विक्री

संभाजीराजे-उदयनराजे भेट

"मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी उदयनजेंची भेट घेणं ही आनंदाची गोष्ट आहे. समाज म्हणून जे जे काही निर्णय घेतले जातील, त्यावेळी आम्ही सारे पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून भूमिकेला पाठिंबा देऊ", असे भांडारी म्हणाले.

नाना पटोले आणि मुख्यमंत्रीपद

"नाना पटोले यांच्याबद्दल काय बोलावे? नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनतील का? याबद्दल मला काहीच वाटत नाही. काँग्रेसची सरकारमध्ये फरफट होत आहे. शिवसेनेसोबत सत्तेत असल्याने हक्काचा मतदार संघ गमावण्याची भिती काँग्रेसला आहे", असे निरिक्षण त्यांनी नोंदवले.

loading image