

AB Form Row Sparks Chaos in Maharashtra Civic Polls
esakal
Political Clashes During Nomination Process Maharashtra : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (ता. ३०) शेवटचा दिवस असल्याने राज्यभरात राजकीय पक्षांत प्रचंड गोंधळ उडाला. दुपारनंतर सर्वच प्रमुख पक्षांमध्ये नाराजीचे नाट्य रंगले. इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालयात ठिय्या मांडला, घोषणाबाजी, धक्काबुक्की, तोडफोड, राजीनामे असे प्रकार घडले. नाराजांची मनधरणी करताना पक्षश्रेष्ठींनाही धावपळ करावी लागली. एकूणच राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत राजकीय रणकंदन पाहायला मिळाले.