NCP: ''माफी काफी नहीं हैं... राजीनामा द्या अन्यथा फिरु देणार नाही'' सत्तारांच्या घरावर दगडफेक

abdul sattar supriya sule
abdul sattar supriya sule
Updated on

मुंबईः खोक्यांवरुन सुरु झालेला वाद आता आक्षेपार्ह टिपण्णीपर्यंत गेला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजीनामा द्या नसता राज्यात फिरु देणार नाही, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर त्यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चाल करुन गेले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सत्तारांच्या घरावर दगड फेकले, त्यांच्या निवासस्थानाच्या काचदेखील फोडल्या.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली असली तरी 'माफी काफी नहीं हैं...' असं म्हणत सत्तारांच्या थेट राजीनाम्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

हेही वाचा : का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

सत्तारांचा राजीनामा घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नसल्याचं चव्हाण म्हणाल्या. सत्तारांना राज्यात आम्ही फिरु देणार नाहीत. त्यांनी दिल्लीची सेक्युरिटी आणावी, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना झोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असंही चव्हाण म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ladki Bahin Yojana
DCM Sunetra Pawar
Supriya Sule on Vidyanand Bapat pune news
Supriya Sule PM Modi meeting
Marathi News Esakal
www.esakal.com