अरे बापरे! देशातील सुमारे ७० ते १०० लोक या आजारांनी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये बहुतांश लोक घरांमध्ये बंद आहेत. त्यात व्यायामाचा अभाव, पुरेसा सूर्यप्रकाश अंगावर न घेणे व संतुलित आहार याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांच्या शरीरात जीवनसत्व ‘ड’ची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे हाडे, दात तसेच स्नायूसंबंधी तक्रारींमध्ये वाढ होत असून देशातील सुमारे ७० ते १०० लोक या आजारांनी त्रस्त असल्याचे डॉक्‍टर सांगतात.

स्नायू, दातदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ; पुरेसा सूर्यप्रकाशही मिळेना
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये बहुतांश लोक घरांमध्ये बंद आहेत. त्यात व्यायामाचा अभाव, पुरेसा सूर्यप्रकाश अंगावर न घेणे व संतुलित आहार याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांच्या शरीरात जीवनसत्व ‘ड’ची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे हाडे, दात तसेच स्नायूसंबंधी तक्रारींमध्ये वाढ होत असून देशातील सुमारे ७० ते १०० लोक या आजारांनी त्रस्त असल्याचे डॉक्‍टर सांगतात. त्यामुळे जीवनसत्व ‘ड’ची पूर्तता तसेच वेळेत योग्य उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निरोगी आयुष्यासाठी हे जीवनसत्व आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्‍यक आहे, असे झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील गुडघे प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. राकेश नायर यांनी सांगितले. शरीरातील ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता औषध तसेच, पूरक आहाराच्या माध्यमातून भरून काढता येते; मात्र त्याचे अतिसेवन झाल्यास ते शरीराला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसारच पूरक आहाराचा वापर करावा.

उपकरप्राप्त इमारतीतील लाखो रहिवाशांना दिलासा, म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

स्वतःच्या मर्जीने कोणतीही औषधे घेऊ नका आणि डॉक्‍टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच ‘ड’जीवनसत्वाचे सेवन करा; अन्यथा भविष्यात ते धोकादायक ठरू शकते, असा इशारा डॉ. नायर यांनी दिला आहे.

अपोलो स्पेक्‍ट्रा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. श्‍वेता सावंत म्हणाल्या की, ‘ड’ जीवनसत्वामुळे शरीरात अनेक रोगांचा सामना करण्याची ताकद तयार होते. या जीवनसत्वाची कमतरता नसल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही असे नाही, पण तो झाला आणि जीवनसत्व‘ड’ची पातळी शरीरात सामान्य असेल, तर विषाणूशी लढण्यास त्या व्यक्तीचे शरीर अधिक सक्षम असेल.

ऑनलाइन वर्गामुळे खर्च वाढला; म्हणून पालक उच्च न्यायालयात

कमतरतेची कारणे

 • आहारात जीवनसत्वाचा अभाव
 • आहारात चरबीचा अभाव
 • पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे
 • जीवनसत्व ‘ड’च्या रूपांतरण आणि शोषणात व्यत्यय निर्माण करणारी औषधे
 • मूत्रपिंड किंवा यकृतासंबंधी काही आजारांमुळे शरीरात पुरेशा प्रमाणात जीवनसत्व ‘ड’ तयार होत नाही

जीवनसत्व ‘ड’च्या कमतरतेची लक्षणे

 • लहान मुलांना मुडदूस होण्याची शक्‍यता
 • प्रौढांमध्ये अस्थिमृदुता 
 • स्नायूंचे थकणे, नाजूकपणा
 • हाडांमध्ये खोलवर दुखणे
 • शरीराची ठेवण राखण्यात अडचण

यातून मिळते ‘ड’जीवनसत्व

 • सकाळचे कोवळे ऊन, हलका शारीरिक व्यायाम
 • मासे, अंडी, चीज, मशरूम, सोया मिल्क, दूध
 • जीवनसत्वच्या गोळ्या
 • Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About 70 to 100 people in the country suffer from these diseases