राज ठाकरेंवर का कारवाई होत नाही? समाजवादी पक्षाचे गृहमंत्र्यांना पत्र

'राज्यात कायद्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे का?'
राज ठाकरेंवर का कारवाई होत नाही? समाजवादी पक्षाचे गृहमंत्र्यांना पत्र
Summary

'राज्यात कायद्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे का?'

राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सध्या अनेक मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप्रपत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, या सगळ्यात आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामुळे आता पुन्हा एकदा उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरेंवर का कारवाई होत नाही? समाजवादी पक्षाचे गृहमंत्र्यांना पत्र
जम्मू-काश्मीर: महत्त्वाची राजकीय घडामोड; केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक

काय आहे पत्रात?

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणतात, सध्या देशभरासह राज्यातही धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण झाले आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी मोक्कासारखा कठोरात कठोर कायदा बनवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे अजाणबाबत भाष्य करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. राज ठाकरे भडकावू भाषण करत असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही?, अस सवालही त्यांनी या पत्रातून केला आहे. राज्यात कायद्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे का?, असंही अबू आझमींनी या पत्रातून विचारले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सकाळी ६ ते रात्री १० भोंगे बंद करता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक नागरीकासाठी कायदा समान असून सर्वांना एकच भूमिका घ्यावी लागणार आहे. कायदा भंग झाला तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही गृहमंत्री वळेसे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरेंवर का कारवाई होत नाही? समाजवादी पक्षाचे गृहमंत्र्यांना पत्र
समृद्धी महामार्गाचं उद्घाटन ढकललं पुढे, 'या' कारणामुळे तारीख बदलली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com