
Pune News: शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा महिलेवर लैंगिक अत्याचार, पट्ट्याने मारहाण अन् विवस्त्र करून..
Pune News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मागील काळात राज्यात भाजप-शिवसेना सरकारच्या काळातील तत्कालीन सामाजिक तथा न्याय मंत्री राहिलेले, शिवसेनेचे नेते उत्तम खंदारे यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार एका 37 वर्षीय महिलेने पोलिसात केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार खांदेरे यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यातून ती महिला गर्भवती राहिली आणि तिला मुलगा झाला. यानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. खंदारे यांनी बरेच दिवस शारीरीक संबंध ठेवल्याचं तक्रारीत महिलेने म्हटलं आहे.
या प्रकरणी आरोपी उत्तम प्रकाश खंदारे, महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी यांच्यासह एका महिलेविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सगळा प्रकार बिबेवाडी येथील बी रेस्ट हाउस पोरळे वस्ती येथील जाधव निवास या ठिकाणी घडला असल्याचे महिलेने तक्रारीत म्हणटं आहे.
हा प्रकार २०१२ पासून चालू होता. या प्रकरणातील आरोपीवर 376,377,406,420,506(2) आणि कलम 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा नेमका आरोप काय?
माजी मंत्री उत्तम खंदारे यांनी महिलेला महिलेला रेस्ट हाऊसमध्ये बोलवून घेतलं. लग्नाचं आमिष दाखवलं तिच्यावर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला.
त्यातून जन्माला आलेल्या मुलाचा उत्तम सांभाळ करतो असं सांगितल त्यासाठी पैशांचा चेक दिला मात्र तो बाऊंस झाला.
या सगळ्यात महिलेने मंत्र्याच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिला विवस्त्र करूण पट्याने मारहाण केली.