भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चिट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

आरोप करणारे तोंडघशी : खडसे
याबाबत खडसेंशी संपर्क केला असता ते म्हणाले, मंत्री असताना कुणीतरी सुपारी घेतल्यासारखे आरोप केले त्यात कुठलीही तथ्य नव्हते. मी कोणतेही चुकीचे काम केले नव्हते त्यामुळे यातुन आपण निर्दोष बाहेर येऊ हा विश्वास होताच. आता या अहवालाने आरोप करणारे कथित समाजसेवक तोंडघशी पडलेत. गेली 40 वर्षे पक्षाची व् समाजाची सेवा केली. कधीही वाटले नाही की सरकार येईल त्यामुळे मंत्रीपदासाठी काम केले नाही. पक्ष व् जनता यांच्यासाठी निष्ठेने काम केले यापुढेही करत राहू.

जळगाव : पुणे भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात पुणे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने एकनाथ खडसे दोषी नसल्याचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला असून यामुळे गेल्या दोन वर्षापासून मंत्रीमंडळाबाहेर असलेल्या खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे.  

भोसरी येथील तीन एकर जमीन खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने उकानी यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारात खडसेंवर पदाचा दुरुपयोग केल्याचा व जमीन कवडीमोल दरात मिळवून देत शासनाचे नुकसान केल्याचा आरोप होता. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी याप्रकरणी पुणे बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली परंतु गुन्हा दाखल न करता पोलिसांनी त्यावेळीच् यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. 

दरम्यान, याप्रकरणी आधी गुन्हा दाखल करावा मग चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई न्यायालयात दाखल कारण्यात आली. यात न्यायालयाच्या आदेशान्वये लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिक्षकांकडून चौकशी करण्यात आली. शेवटी या विभागाने अंतिम अहवाल कोर्टात सादर करून खडसेंना क्लीन चिट दिली आहे.

याच प्रकरणी न्या. झोटिंग यांच्या चौकशी समितीचा अहवालही मुख्यमंत्र्यांकड़े सादर करण्यात आला आहे. या अहवालाने आता खडसेंचा मंत्रीमंडळातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

आरोप करणारे तोंडघशी : खडसे
याबाबत खडसेंशी संपर्क केला असता ते म्हणाले, मंत्री असताना कुणीतरी सुपारी घेतल्यासारखे आरोप केले त्यात कुठलीही तथ्य नव्हते. मी कोणतेही चुकीचे काम केले नव्हते त्यामुळे यातुन आपण निर्दोष बाहेर येऊ हा विश्वास होताच. आता या अहवालाने आरोप करणारे कथित समाजसेवक तोंडघशी पडलेत. गेली 40 वर्षे पक्षाची व् समाजाची सेवा केली. कधीही वाटले नाही की सरकार येईल त्यामुळे मंत्रीपदासाठी काम केले नाही. पक्ष व् जनता यांच्यासाठी निष्ठेने काम केले यापुढेही करत राहू.

Web Title: ACB gives clean chit to Eknath Khadse in Bhosri land case