दरवर्षी रस्ते अपघातात १३ ते १६ हजार मृत्यू; सुरक्षिततेची पंचसूत्री पाळा अन्‌ अपघात टाळा

दरवर्षी राज्यात रस्ते अपघातात सरासरी १३ ते १६ हजार जणांचा मृत्यू होतो. घरातील कर्ता गेल्याने कधीही घराबाहेर न पडलेल्या विवाहितेला अनेक संकटांचा अचानक सामना करावा लागतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पर्यायाने मुलांच्या शिक्षणासाठी तिला खूप संघर्षमय जीवन जगावे लागते.
Indian Driving License News Updates
Indian Driving License News UpdatesSakal

सोलापूर : परगावी गेलेले बाबा आता घरी येतील, अशी वाट पाहणाऱ्या मुलांचे वडील चालवीत असलेली बस सोमवारी (ता. १२) दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबीचिंचोळी गावाजवळ उलटली आणि अपघातात बसचालक मोहम्मद मौनोद्दीन यांचा जागीच मृत्यू झाला. अचानकपणे सुखाचा संसार अर्ध्यावर मोडला आणि उतारवयातील आई-वडिलांचा आधार हिरावला. दरवर्षी राज्यात रस्ते अपघातात सरासरी १३ ते १६ हजार जणांचा मृत्यू होतो. अनेकजण गंभीर जखमी होत आहेत. घरातील कर्ता गेल्याने कधीही घराबाहेर न पडलेल्या विवाहितेला अनेक संकटांचा अचानक सामना करावा लागतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पर्यायाने मुलांच्या शिक्षणासाठी खूप संघर्षमय जीवन जगावे लागते. वाहनांचा वाढलेला वेग आणि कमवून ठेवण्याची लालसा, हेच त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मन शांत ठेवून गडबड न करता वाहन चालविल्यास अपघात होणार नाहीत, हे निश्चित.

प्राणांतिक अपघातच सर्वाधिक....

दहा कोटींचा दंड भरला, पण नियम नाही पाळला...

अडीच वर्षांतील जिल्ह्यातील अपघाती मृत्यू
वर्ष      अपघात   मृत्यू
२०२०  ९६२      ४९५
२०२१  १,१०३   ६०९
२०२२  ७९३      ४५७
एकूण   २,८५८   १,५६१

भगवद्‌गीता सांगते, चंचलं हि मन...

विनाअपघात ड्रायव्हिंगची पंचसूत्री...
१) दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालावे अन्‌ चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावावा
२) वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा अधिक नकोच; लवकर निघा अन्‌ सुरक्षित पोहोचा
३) रात्रीचा प्रवास टाळा; पुरेशी झोप घ्या, तासन्‌तास ड्रायव्हिंग नकोच
४) प्रत्येक तीन तासांनी थोडे थांबा; वाहन चालविताना हवी मन:शांती
५) मद्यपान करून वाहन चालवू नका; वाहन चालविताना नको मोबाईल टॉकिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com