शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ खंडित काळातही देणार

राज्य सरकारने खंडित कालावधीतील प्राप्त झालेले विमा दावे मंजूर करण्यासाठी कृषी आयुक्तांना प्राधिकृत केले आहे.
Farmers Accident Insurance
Farmers Accident Insurancesakal
Summary

राज्य सरकारने खंडित कालावधीतील प्राप्त झालेले विमा दावे मंजूर करण्यासाठी कृषी आयुक्तांना प्राधिकृत केले आहे.

पुणे - प्रशासकीय कारणांमुळे सन २०१९ मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंमलबजावणीत दोन दिवस खंड पडला होता. या खंडित कालावधीत अपघात झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. कारण या कालावधीतील शेतकरी अपघात विमा योजनेचे विमा दावे मंजूर होऊ शकले नव्हते. परंतु आता या खंडित कालावधीत अपघात झालेल्या आणि या विमा योजनेचा लाभ न मिळू शकलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीत ८ डिसेंबर २०१९ व ९ डिसेंबर २०१९ हे दोन दिवस खंड पडला होता. प्रशासकीय कारणामुळे हा खंड पडल्याने, हा कालावधी आता खंडित कालावधी म्हणून घोषित करण्यास आला आहे. त्यामुळे या कालावधीतील पात्र विमा दावेही आता मंजूर करण्यास सरकारने परवानगी दिली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी मंगळवारी (ता. १४) सांगितले.

राज्य सरकारने खंडित कालावधीतील प्राप्त झालेले विमा दावे मंजूर करण्यासाठी कृषी आयुक्तांना प्राधिकृत केले आहे. या अपघात विमा योजनेतंर्गत अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व अपंगत्व आले असल्यास प्रकरणानुसार किमान १ लाख ते कमाल २ लाख रुपेय, याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे.

येथे करा विम्यासाठी अर्ज

गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेच्या खंडित कालावधीत अपघात झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांनी त्यांचे विम्याबाबतचे दावे आपापल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्‍यक आहे. हे दावे नियमानुसार आवश्‍यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जांसह सादर करणे अनिवार्य आहे. विहित नमुन्यातील अर्ज हे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून दिले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com