नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 11 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

यवतमाळ : आज (ता. 1) पहाटे 3:45 ला नागपूर तुळजापूर महामार्गावरील आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटाजवळ मानवी मनाला पाझर फोडणारी घटना घडली. क्षणात होत्याचे नव्हते झाले. लग्नाची पार्टी करून देवदर्शनाला जाणारे दिल्ली, कर्नाल, नागपूरचे शिख कुटुंबीयांच्या तवेरा गाडीचा अपघात झाला आणि  यामध्ये तीन महिला, तीन पुरुष, चार मुली, एक मुलगा असे अकरा व्यक्ती घटनास्थळीच ठार झाले तर एकाला  गंभीर अवस्थेत नागपूरला नेले. 

सविस्तर नागपूर येथील जोगींदरसिंग सोहनसिंग मन्नी यांच्या सतबीरसिंग या मुलाचे 29 मे रोजी लग्न झाले. त्या लग्नासाठी त्यांचे दिल्ली, हरयाण मधील कर्नाल येथिल नातेवाईक आले होते. 30 मे रोजी कौटुंबिक कार्यक्रम आटोपून 31 मे रोजी रात्री 10 वाजता नांदेड येथील सचखंडा गुरुद्वारा च्या दर्शनासाठी तीन तवेरा गाड्यांमधून संपुर्ण नातेवाईक जात होते. त्यातील गाडी क्रमांक एम एच 20 सी एच 3584 या तवेरा गाडीला नांदेड वरून पपई घेऊन जानारा ट्रक क्रमांक एम एच 04 एफ यु 9422 यांची कोसदनी घाटाजवळ समोरासमोर धडक झाल्याने ट्रक जाग्यावरच पलटी झाला तर तवेरा गाडी चेंदामेंदा झाली. त्यामध्ये सोनिया विहार दिल्ली येथील किरण तिलकराज मेहता (42), मिनल तिलकराज मेहता (40),कुणाल तिलकराज मेहता (15), तिलकराज मेहता (48), शिवाणी तिलकराज मेहता (12), कर्नाल हरियाणा येथील बनारसिंग (40), तोशी (38), नागपुर येथील डिंपल परमजीतसिंग मन्नी (11), सिमरन परमजीतसिंग मन्नी (8), ड्रायव्हर विलास नरेश भोयर (38) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर किरण बलजीतसिंग (12) व एक व्यक्ती गंभीर असल्यामुळे यवतमाळ हलवण्यात आले. परंतु रस्त्यातच किरण चा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे त्याला नागपुर पाठवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच कोसदनी, लोणबेहळ येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. लोणबेहळ येथील निलेश आचमवार, बाबाराव गावंडे, कोसदनी येथील ज्ञानेश्वर राऊत, संजय ठाकरे, हायवे पोलिसांनी मृतकांना तवेरा मधुन काढुन आर्णी ग्रामीण रुग्णालयात आनले. आर्णी चे प्रभारी ठाणेदार भंडारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन भोंडे, सह पोलीस कर्मचारी यांनी मृतांच्या नातेवाईकांना माहीती देऊन मृतांना शवविच्छेदना साठी नेले. यावेळी शहरातील अनवर पठाण, अंकुश राजुरकर, निलेश गावंडे, नाना नागापुरे, सह अनेक तरूण मंडळी ग्रामीण रुग्णालयात मदतीसाठी होती.

Web Title: accident at nagpur tuljapur highway 11 dies from one family