Accident News
Accident News

Accident News : कोकणात आणखी एक भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई - कोकणासाठी आजचा वार अपघात वार ठरल्याचं चित्र आहे. काही तासांपूर्वीच भीषण अपघातात ९ जण ठार झालेला असताना आणखी एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Konkan Accident News in Marathi)

Accident News
Narendra Modi : 'मी मुंबईत असेन…' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला.

बस मुंबई ते गोव्याच्या दिशेने जात होती. या बस 36 प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com