५ वर्षांत ४४ वन्यजीवांचा अपघाती मृत्यू! वाहनांच्या धडकेत वन्यजीवांचे बळी; वर्दळीच्या रस्त्यांवर जनजागृतीचे नाहीत पुरेसे फलक

जिल्ह्यातील महामार्गाच्या वाढत्या जाळ्यामुळे सतत वन्यजीवांचे अपघात होत आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी वर्दळीच्या रस्त्यावर जनजागृतीचे फलक लावणे आवश्यक आहे.
Malharpeth Pandharpur highways number of increasing wild animal accident
Malharpeth Pandharpur highways number of increasing wild animal accidentsakal

सोलापूर : जिल्ह्यातील महामार्गाच्या वाढत्या जाळ्यामुळे सतत वन्यजीवांचे अपघात होत आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी वर्दळीच्या रस्त्यावर जनजागृतीचे फलक लावणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात महामार्गाचे जाळे वाढत आहे. यामुळे वन्यजीवांच्या रहिवासावर निर्बंध आले असून एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करणे कठीण झाले आहे. शहराच्या सहा दिशांना जाणारे अत्यंत वर्दळीचे चारपदरी महामार्ग आहेत. या महामार्गावर दिवसरात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. यामुळे सतत अज्ञात वाहनांच्या धडकेने वन्यजीवांचे बळी जात आहेत.

बार्शी रस्त्यावर नान्नज येथील अभयारण्य वन्यजीव विभागाच्या ताब्यात आहे. यामुळे या अभयराण्य परिसरात जनजागृती फलक तसेच जागोजागी गतीरोधक तयार करण्यात आले आहेत. मात्र, इतर महामार्गावरही अशाच प्रकारची प्राण्यांची वर्दळ असते मात्र याबाबत जनजागृती करणारे फलक किंवा गती रोधक तयार करण्यात आलेले नाहीत. अभयारण्याचा परिसर नसला तरी इतर मार्गांवरही ज्या ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे तिथे जनजागृती फलक लावणे आवश्यक आहे.

गाड्या सावका चालवा

होटगी तलावाच्या खालील भागात खूप वेळा साळिंदर, ससे, कोल्हे असे वन्यप्राणी वाहनाखाली चेपले गेलेले आहेत. त्याही ठिकाणी येथे वन्यप्राण्यांचा रहदारी आहे. गाड्या सावकाश हाका, असे फलक लावण्याची गरज आहे. यापूर्वी देखील आम्ही खूप वेळा वनविभाच्या निदर्शनात आणून दिलेले आहे.

- मल्लिकार्जुन धुळखेड, वन्यजीवप्रेमी

वन्यजीवांचे जनत व संवर्धन गरजेचे

विकासाच्या नावाखाली मानवाने मोठ्या प्रमणात जंगलतोड केली. यामुळे वन्यजीवांचा आधिवास धोक्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात माळरान ही स्वतंत्र जैवविविधता आहे. याचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे.

- अजित चौहान, अध्यक्ष वॉल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूर

काही ठळक दुर्घटना...

  • - २४ जून २०२२ रोजी टेंभुर्णी (ता. माढा) जवळील शिराळ गावाजवळ एक पूर्ण वाढ झालेल्या बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यूमुखी पडला.

  • - २७ मार्च २०२२ केगाव-हत्तुर बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलावरून पडल्याने एका काळविटांचा मृत्यू

  • - १४ जानेवारी २०२३ हिवरे (ता. मोहोळ) येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक गवा मृत्यूमुखी पडला.

  • - २८ जानेवारी २०२३ केगाव-हत्तुर बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलावरून पडल्याने १४ काळविटांचा मृत्यू

वर्षनिहाय वन्यजीवांचे मृत्यू

  • वर्ष मृत्यू

  • २०१८-१९ ५

  • २०१९-२० ३

  • २०२०-२१ २

  • २०२१-२२ ९

  • २०२२-२३ २५

  • एकूण ४४

निशाचर प्राण्यांचे सर्वाधिक बळी

शहराच्या विविध दिशांना जाणाऱ्या महामार्गावरून रात्रीच्यावेळी वर्दळ कमी असताना वेगमर्यादा ओलांडून वाहने धावतात. याच वेळी निशाचर प्राणी अन्न व पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडलेले असतात. यावेळी साळिंदर, कोल्हे, ससे अशा प्राण्यांचे बळी मोठ्या प्रमाणात बळी जातात. सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांमध्ये हैदराबाद रस्ता, अक्कलकोट रस्ता व होटगी रोडवर साखर कारखान्याच्या पुढे सतत अपघात होतात. याठिकाणी रात्री दिसतील असे रेडियमचे फलक लावणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com