खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघात; पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याच्या पुढे खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघात झाला. पुणे येथून सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक विरुद्ध बाजूने येणाऱ्या मोटारींवर आदळला. चार वाहनांच्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी पावणेअकराच्या सुमारास झाला.

मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून, सर्व मृत पुण्यातील असल्याचे समजते. जखमींना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक दुभाजक किलोमीटर क्र.४० जवळ तोडत विरुद्ध बाजूने येणाऱ्या मारुती सेलेरीओ, टाटा इंडिका व इनोवा मोटारीस जोरदार धडक दिली. या धडकेत इंडिका मोटार सुमारे साठ ते सत्तर फुट खोल दरीत पडली. तर सेलेरीओ गाडीचा चक्काचूर झाला. तसेच यामध्ये दोन्ही मोटारीतील तीन महिलांसह दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटच्या गोण्यातील सिमेंट मार्गावर पसरल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, आयआरबी कंपनीचे कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांच्या माध्यमातून रस्ता साफ करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Accidents near Khopoli Exit Five Died three injured