डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवयाची का? राज्यातील डॉक्टरांच्या संघटनांचा संतप्त सवाल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 July 2020

लातूर येथे एका डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बुधवारी (ता.२९) सकाळी घडली. या हल्ल्याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुणे : कोरोना विषाणूंच्या उद्रेकात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरवर झालेला प्राणघातक हल्ला निषेधार्ह आहे. त्यामुळे डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवयाची का, असा सवाल डॉक्टरांच्या संघटनांमधील प्रतिनिधींनी केला. 

ऐकावे ते नवलच! कोरोनाने मृत्यू झालेली 'ती' झाली पुन्हा जिवंत

लातूर येथे एका डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बुधवारी (ता.२९) सकाळी घडली. या हल्ल्याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत केली. ऑनलाईन आयोजित केलेल्या या परिषदेत डॉ. मंगेश पाटे, डॉ. सुहास पिंगळे आणि आयएमएच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी उपस्थित होते. 

प्रबळ इच्छाशक्तीच! पुण्यात शंभर वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

डॉ. भोंडवे म्हणाले, “कोरोनाविरोधात राज्यातील डॉक्टर प्राणपणाने लढत आहेत. प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सेवा देण्यासाठी दिवस-रात्र झटत आहेत. मात्र, लातूरमधील डॉक्टरांवरील हल्ल्याने या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना होत आहेत. पण, राज्यातील प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही. मुंबईत दमदाटी करून रुग्णालयांचे बील कमी करून घेतल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात डॉक्टर खूप जास्त बिल लावतात. ते रुग्णांना लुबाडतात, हे एककल्ली आहे. त्यात डॉक्टरांची, रुग्णालयांची बाजू समजून घेतली जात नाही.

वस्तुस्थिती अशी आहे की, खासगी रुग्णालयांना सरकारने दिलेले दर न परवडणारे आहेत. हे दर वस्तुनिष्ठ नाहीत. व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, पीपीई किट, जैव कचरा या सगळ्या खर्चात वाढ झाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा खर्च वाढला आहे. अशा स्थितीत डॉक्टर काम करत आहेत. पण, सरकार, मंत्र्यांकडून वारंवार रुग्णालय डॉक्टरांना लुटतात, असे सांगितले जाते.” 

राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी

डॉ. पाटे, “सोशल मीडियामधून डॉक्टरांवर शाब्दिक, व्हिडिओच्या माध्यमातून हल्ले होत आहेत. कोरोना उद्रेकात कठीण काळात रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.” 
डॉ. पिंगळे म्हणाले, “सरकार आणि विविध पक्षांचे नेते पहिल्या दिवसापासून डॉक्टरांशी धमकीवजा भाषेत बोलत आहेत.  त्यामुळे डॉक्टरांबद्दल आकस आणि द्वेष निर्माण झाला आहे.” 
या हल्ल्यामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे.

रुग्णालयातील कर्मचारी सोडून गेले आहेत. कमी मनुष्यबळावर खासगी डॉक्टर सरकारी आरोग्य व्यवस्थेला मदत करत आहेत. अशा परिस्थितीत हा हल्ला झाला आहे, अशा शब्दात लातूर येथील डॉक्टरांनी भावना व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused who attacked doctors in Latur should be severely punished demand by Indian Medical Association