तुषार भोसले यांनी केला त्यांचा नावासंबंधी मोठा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

तुषार भोसले हे प्रकाशझोतात आल्यानंतर सोशल मिडीयावर तुषार भोसले यांच्या नावावरून उलट सुलट चर्चा सुरु होत्या त्यावर esakal.com ने पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणारे आचार्य तुषार भोसले कोण आहेत? वाचा सविस्तर या मथळ्याखाली बातमी केली होती. या बातमीवर तुषार भोसले यांनी त्यांच्या नावासंबधी खुलासा केला आहे.

पुणे : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं कर्जाने ताब्यात घ्यावं, असा पर्याय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला. यावरुन आचार्य तुषार भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. यानंतर तुषार भोसले हे चांगलेच प्रकाशझोतात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तुषार भोसले हे प्रकाशझोतात आल्यानंतर सोशल मिडीयावर तुषार भोसले यांच्या नावावरून उलट सुलट चर्चा सुरु होत्या त्यावर esakal.com ने पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणारे आचार्य तुषार भोसले कोण आहेत? वाचा सविस्तर या मथळ्याखाली बातमी केली होती. या बातमीवर तुषार भोसले यांनी त्यांच्या नावासंबधी खुलासा केला आहे.
------
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत काशी विश्वनाथ मंदिराचा मोठा निर्णय
------
पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणारे आचार्य तुषार भोसले आहेत तरी कोण?
------
तुषार भोसले काय म्हणाले?

माझे नांव तुषार शालिग्राम भोसले असून "शास्त्री" व "आचार्य" या पदव्या मी संपादित केल्या आहेत. परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक माझी बदनामी करण्याकरिता माझे खरे नाव आचार्य तुषार भोसले नसून तुषार शालिग्राम पितांबर असे आहे व हा बहुजन नसून ब्राह्मण आहे असा सोशल मिडीयात अपप्रचार सुरु केला आहे. तरी माझे खरे नाव आचार्य तुषार शालिग्राम भोसले हेच आहे.
------
लॉकडॉऊन 4:0 च्या गाईडलाईन जाहीर; काय चालू, काय बंद?
-------
धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिकाचे कोरोनामुळे निधन
-------
कोण आहेत आचार्य तुषार भोसले?
आचार्य तुषार भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आहेत. तसेच ते वारकरी संप्रदायाचे व अध्यात्मिक क्षेत्रातील आचार्य आहेत, असे सांगितले जाते. यापूर्वी अनेकदा त्यांनी मंदिराच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील नेत्यांना खडे बोल सुनावलेले आहेत. राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांची तुलना शिवसेना नेते संजय राऊत यांनी विठ्ठलाशी केली होती. यावरच तुषार भोसले यांनी टीका केली होती. तसेच, आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना विठ्ठलाची पूजा करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही जोपर्यंत ते राऊतांच्या वक्तव्याप्रकरणी खुलासा व्यक्त करत नाही, असा पवित्राही तुषार भोसले यांनी घेतला होता. दरम्यान भोसले यांचा हा व्हीडिओ महाराष्ट्र भाजपने ट्वीट केला होता. तसेच, पृथ्वीराज चव्हाण यांना ठणकावणारा व्हिडिओही नागपूर भाजपच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acharya Tushar Bhosale made a revelation about his name