लॉकडाउन 4च्या गाइड लाईन्स जाहीर; जाणून घ्या काय सुरू? काय बंद?  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india lockdown 4 guidelines marathi maharashtra

देशात संध्याकाळी सात ते सकाळी सात कर्फ्यू कायम असणार आहे. यात जिल्हा रेड झोनमध्ये असला किंवा नसला तरी, कर्फ्युचा हा नियम सगळ्यांनाच असणार आहे.

लॉकडाउन 4च्या गाइड लाईन्स जाहीर; जाणून घ्या काय सुरू? काय बंद? 

नवी दिल्ली Coronavirus : देशात आज तिसऱ्या लॉकडाउनची मुदत संपली आणि उद्या पासून देशभरात चौथा लॉकडाउन सुरू राहणार आहे. या लॉकडाउनची नियमावली केंद्र सरकारनं जाहीर केलीय. त्यात लॉकडाउनचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. देशातील 30 मोठी शहरं संपूर्णपणे लॉक करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश आहे. देशात संध्याकाळी सात ते सकाळी सात कर्फ्यू कायम असणार आहे. यात जिल्हा रेड झोनमध्ये असला किंवा नसला तरी, कर्फ्युचा हा नियम सगळ्यांनाच असणार आहे. दरम्यान, देशात एकूण रुग्णांची संख्या 90 हजार असून, गेल्या 24 तासांत 4 हजार 987 नवे रुग्ण सापडले आहेत. 

आणखी वाचा - महाराष्ट्रातील सात शहरांना लॉकडाउनची सूट नाहीच

काय बंद राहणार?

  • मेट्रो
  • रेल्वे
  • विमानसेवा
  • शाळा-कॉलेज
  • विद्यापीठे 
  • हॉटेल्स
  • रेस्टॉरंट्स
  • थिएटर
  • स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
  • धार्मिक स्थळं
  • राजकीय, सार्वजनिक कार्यक्रम 

आणखी वाचा - ही बातमी आशेचा किरण; भारतात औषधाच्या चाचण्या सुरू

काय सुरू राहणार?

  • सरकारी कार्यालयं (कमी मनुष्यबळावर) 
  • सरकारी कार्यालयांमधील कॅन्टिन
  • श्रमिक रेल्वे देशभरात धावणार
  • दोन राज्यांमधील बस सेवा-परस्पर संमतीने 
  • रेस्टॉरंट्स सुरू राहतील (केवळ पार्सल सेवा)

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यांना असतील अधिकार
केंद्र सरकारने लॉकडाउनची नियमावली जाहीर करताना, राज्य सरकारांच्या हातात काही अधिकार दिले आहेत. यात राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्हे ठरवण्याचे अधिकार पूर्णपणे राज्य सरकारच्या हाती देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांचे निकष ठरविण्याचे आणि लॉकडाउन शीथिल करणे व न करण्याचे अधिकारही राज्य सरकारकडे असणार आहेत. दरम्यान, पंजाब, महाराष्ट्र आणि तमीळनाडू या राज्यांनी यापूर्वीच लॉक डाउनमध्ये 31 मेपर्यंत वाढ केली आहे.

टॅग्स :India