संवर्धनात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 30 December 2019

छत्रपती शिवाजी महाराजांची (हिंदवी स्वराज्याची) राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संवर्धनाची काही कामे सुरळीत सुरू आहेत, मात्र महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे; तसेच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई; तसेच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

मुंबई - रायगड संवर्धनाच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांना आज दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपती शिवाजी महाराजांची (हिंदवी स्वराज्याची) राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संवर्धनाची काही कामे सुरळीत सुरू आहेत, मात्र महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे; तसेच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई; तसेच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद 

संभाजीराजे म्हणाले की, रायगड संवर्धनाची जी कामे सुरू आहेत त्यापैकी रायगडाच्या संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये किल्ल्याच्या डागडुजीसाठी खर्च केले जाणार आहेत; तर १४७ कोटी रुपये हे महाड ते रायगड किल्ल्यादरम्यानच्या रस्त्यासाठी खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. तर, रोपवेच्या कामातही मनमानी कारभार पाहायला मिळत आहे. रोपवेचे काम करणारे संबंधित लोक कोणत्याही परवानगीशिवाय रोपवेची क्षमता वाढवत आहेत. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on fraudsters in conservation uddhav thackeray