जगण्यातील रंगत समजलेला कलाकार; हेमंत जोशी

जगण्यातील रंगत समजलेला कलाकार; हेमंत जोशी
Updated on
Summary

मालिकांतून अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे हेमंत जोशी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याबद्दल...

‘मुख्यमंत्री ना. गणप्या गावडे’,(Ganapya Gawde) आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ (Dr. Kashinath Ghanekar)अशा अनेक चित्रपटांत तर ‘रात्रीस खेळ (Ratris khel chale)चाले’, ‘जीव झाला वेडा पिसा’(Jiv jhala veda pisa) अशा टीव्ही(T.V serial) मालिकांतून अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे हेमंत जोशी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याबद्दल...(actor-hemant-joshi-sangli-memrise-film-marathi-news)

हेमंत जोशी... मनाने निखळ, भिडस्त स्वभाव. ते आपल्यात नाहीत आणि त्यामुळे मला लिहावं लागतंय, हे मनाला पटतच नाही. लहानपणापासून मी त्यांच्या कलेचा चाहता राहिलोय. त्यांची ‘मुख्यमंत्री गणप्या गावडे’ मधील भूमिका गाजली. आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात जेव्हा ते ‘संभाजी म्हणजे सहा फूट उंची’ असे ते धीरगंभीर आवाजात अभिनयातून व्यक्त करतात तेव्हा आपल्या खूप जवळची व्यक्ती पडद्यावर उभी आहे, याचा एक विलक्षण आनंद मिळून जातो. त्यांच्यासोबत काम करताना एक खूप ताकतीने आणि तितक्याच सहजतेने अभिनय करणारे कलाकार आपल्या जवळ उभे आहेत, याचं कधीकधी दडपण यायचं. पण जेव्हा चिन्मया सुर्वे म्हणायच्या ‘भावे किती हो साधे तुम्ही’, तेव्हा खरंच असं वाटून जायचं की कसं जमतं या व्यक्तीला इतकं साध राहणं!

त्यांची आणि माझी भेट म्हणजे एक किस्साच. मी सांगलीत कुकर दुरुस्तीसाठी आलो होतो. तिथे एकजण आले अन् दुकानदाराला म्हणाले, ‘‘डॉक्टर साहेब तुमचा पेशंट आणलाय. कालपर्यंत नीट होता, आज सकाळपासून काय शिट्टी वाजवेना. बघा जरा औषध गोळ्या द्या.’’ मी त्यांना बरोबर ओळखलं, हेमंत सर होते. मी त्यांना भेटल्याच्या धुंदीत घरी आलो, मित्रांना किस्सा सांगून कॉलर टाईट करून घेतली. ‘जीव झाला..’ च्या निमित्ताने त्यांना जवळून अनुभवता आले. त्यांच्या मिश्कीलपणाचे किस्से ऐकून होतो, आता सेटवर एन्जॉय करू लागलो.

पडद्यावर धीरगंभीर, बेरकी भूमिका साकारणारे ‘भावे’ मिश्कील, आनंदी आणि जिंदादिल होते. त्यांना कधीच उदास पाहिलं नाही. ‘सर कसे आहेत’, या प्रश्‍नावर उत्तर ठरलेलं, ‘ऐश रे ऐश.’ सांगली अर्बन बँकेतील नोकरी, शिक्षणाबद्दलचे अनुभव ऐकलं की वाटायचं की खरंच कलेसाठी किती प्रतिकूल परिस्थितीतून धडपड करत त्यांनी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर राज्य केले. त्यांच्याकडून अजून खूप शिकायचं होतं, खूप काम करायचं होतं. पण त्यांचा जेवढा सहवास लाभला त्यात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ते जिथे कुठे असतील तिथे ‘ऐश’ करत असतील.

- प्रतीक राजेंद्र जोशी, सहकलाकार ‘जीव झाला वेडा पिसा’

हेमंतराव आणि माझे वडील सांगली अर्बन बँकेत एकत्र नोकरीला. घरी येणे-जाणे असायचे. ते मित्रांच्या गुणांचे दिलखुलासपणे कौतुक करायचे. आपलं काम मन लावून करायचे, तो अभिनय असो, व्हॉईस ओव्हर असो किंवा दररोजचा व्यायाम, त्यांनी कधीच पाट्या टाकल्या नाहीत. आहाराबाबत सतर्क. त्यांचा फिटनेस उत्तम होता. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती. त्यांनी आणि मी भरपूर रेकॉर्डिंग केली. मला नेहमी म्हणायचे, ‘मी अनेक स्टुडिओमध्ये काम केले आहे; पण तुझ्यासारखं आवाजाला मेकअप कोणी करत नाही.’ अलीकडेच लिखाणात सुद्धा मनापासून लक्ष घातले होते. मित्रांवर भरभरून लिहायचे. त्यांच्या जाण्यानं मित्रांचा कट्टा रिकामा वाटू लागला आहे.

- प्रदीप कुलकर्णी, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com