मोठा निर्णय! अतिरिक्त शिक्षकांची आता ‘DAIT’ व ‘SCERT’वर नेमणूक; काम न करता मिळणारे वेतन बंद

राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (एससीईआरटी) परिषद कार्यालयात विषय सहायक व समुपदेशकांची पदे भरली जाणार आहेत. त्याठिकाणी अतिरिक्त शिक्षकांमधूनच ५४० पदे भरली जाणार आहेत.
Mantralay
Mantralayesakal

सोलापूर : राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (एससीईआरटी) परिषद कार्यालयात विषय सहायक व समुपदेशकांची पदे भरली जाणार आहेत. त्याठिकाणी नव्याने भरती करण्याऐवजी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमधूनच ५४० पदे भरली जाणार आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून त्या अतिरिक्त शिक्षकांना ना शाळांनी हजर करून घेतले ना ते शिक्षक त्याठिकाणी रुजू झाले. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील जवळपास बाराशे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यातील साडेसहाशेपेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. तरीपण, त्यांना शासनाकडून नियमित दरमहा वेतन दिले जात आहे. हा प्रकार बंद व्हावा म्हणून यापुढे समुपदेशन करून राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अशाच पद्धतीने शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विभागांमध्ये नेमले जाणार आहे. वेळप्रसंगी त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून दुसऱ्या जिल्ह्यात देखील पाठविले जाणार आहे.

दरम्यान, दरवर्षी निर्माण होणारा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा पेच आता शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे कायमस्वरूपी मिटेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणार नाहीत, त्यांची पदे रद्द केली जाणार आहेत. त्यादृष्टीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील जवळपास बाराशे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.

त्यातील साडेसहाशेपेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. तरीपण, त्यांना शासनाकडून नियमित दरमहा वेतन दिले जात आहे. हा प्रकार बंद व्हावा म्हणून यापुढे समुपदेशन करून राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अशाच पद्धतीने शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विभागांमध्ये नेमले जाणार आहे. वेळप्रसंगी त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून दुसऱ्या जिल्ह्यात देखील पाठविले जाणार आहे.

दरम्यान, दरवर्षी निर्माण होणारा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा पेच आता शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे कायमस्वरूपी मिटेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणार नाहीत, त्यांची पदे रद्द केली जाणार आहेत. त्यादृष्टीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.

खासगी शाळांमधील १७३ पदे होणार रद्द

पटसंख्येअभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे चार महिन्यांपूर्वी समायोजन प्रक्रिया पार पडली. त्या शिक्षकांना समुपदशेनातून शाळांवर नियुक्ती दिली. पण, काहीजण त्या शाळांवर रुजू झालेच नाहीत, तर काहीजणांना संबंधित शाळांनी सामावून घेतलेले नाही. या पार्श्वभूमीवर शाळांवर हजर न झालेल्या शिक्षकांचे वेतन आता थांबविण्यात आले आहे. दुसरीकडे ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतलेले नाही, त्या खासगी शाळांमधील तब्बल १७३ पदे व्यपगत (रद्द) करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना पाठवला आहे. त्यानुसार आता संबंधित शाळांमधील तेवढी पदे रद्द केली जाणार आहेत.

शिक्षण संचालकांच्या पत्रातील ठळक बाबी…

  • शाळेचे नाव,माध्यम, विषय, नेमणूक व सेवानिवृत्तीचे वर्ष अशा २३ मुद्द्यांवर मागविली माहिती

  • अतिरिक्त शिक्षकांवर आता विषय सहायक व समुपदेशकाची जबाबदारी

  • ५४० अतिरिक्त शिक्षकांची डायट, एससीईआरटी व प्रादेशिक विद्या परिषदेत होणार नेमणूक

  • शाळांवर हजर न होणाऱ्या शिक्षकांना आता दुसऱ्या जिल्ह्यात मिळणार समायोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com