एप्रिल महिना संपत आला आहे. पण माझी लाडकी बहीण योजनेतील या महिन्याची रक्कम अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेली नाही. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पात्र महिलांना एप्रिल महिन्यासाठी १५०० रुपये दिले जातील. परंतु अक्षय्य तृतीयेचा दिवस उलटून गेला आहे. सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिली आहे.