Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर थेट हल्ला; म्हणाले, ते फक्त... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray slam cm eknath shinde over Maharashtra Karnataka dispute political news

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर थेट हल्ला; म्हणाले, ते फक्त...

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच भाजपनेचे इतर राज्यातील नेत्यांचे देखील महाराष्ट्रातील दौरे वाढले आहे. योगी आदित्यनाथ हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावरून आदित्य ठाकरे यांनी चौफेर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवला. (Aditya Thackeray news in Marathi)

हेही वाचा: Burj Khalifa : जबरदस्त! उंची 828 मीटर अन् मजले 168; या गगनचुंबी इमारतीचं नाव बुर्ज खलिफा का ठेवलं ?

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत विचारलं असता, आदित्य म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अशोक गेहलोत आले होते. शिवराज सिंह चौहाण देखील येऊन गेले. हे मुख्यमंत्री आपआपल्या राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी येत असतात. मात्र आपले अवैध मुख्यमंत्री कधीही कुठे जात नाहीत. राज्याबाबत काहीही विचार करत नाही, असंही आदित्य यांनी म्हटलं.

हेही वाचा: Sharad Pawar: भाजपचं मिशन ४५ जाहीर होताच; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, पुण्यात घेतली बैठक

योगी आदित्यनाथ म्हणाले की फिल्मसिटी आम्ही उत्तर प्रदेशला नेणार नसून यापेक्षा मोठी फिल्मसिटी उभारणार आहोत. याबाबक विचारलं असता आदित्य म्हणाले, त्यांनी ४० आमदार आणि एक गद्दार नेलाच आहे. मात्र मुंबईतून काहीही जाणं शक्य नाही.

दरम्यान एकनाथ शिंदे दिल्लीला जावून स्वत:चेच विषय मांडतात. मंत्रीमंडळाचा विस्तार अजून झाला नाही, त्याचा दबाव त्यांच्यावर आल्याचं म्हणत आदित्य य़ांनी शिंदे यांनी निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं.