Aaditya Thackeray: गुवाहटीच्या वाटेवर पळून आलेले हेच ते आमदार म्हणत आदित्य ठाकरेंनी मारली नितीन देशमुखांना मिठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray: गुवाहटीच्या वाटेवर पळून आलेले हेच ते आमदार म्हणत आदित्य ठाकरेंनी मारली नितीन देशमुखांना मिठी

Aaditya Thackeray: गुवाहटीच्या वाटेवर पळून आलेले हेच ते आमदार म्हणत आदित्य ठाकरेंनी मारली नितीन देशमुखांना मिठी

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सूरतमध्ये गेलेले बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून परतले. राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं तीव्र बंड झालं. कारण शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले. त्यातच नॉट रिचेबल असलेले बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख परत आले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बाळापूर येथे सभेत पश्चिम विदर्भात एकच निष्ठावान आमदार आहे असं म्हणत नितीन देशमुख यांना मिठी मारली आहे.

बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पश्चिम विदर्भात एकच निष्ठावान आमदार आहे. त्याला आज मी मिठी मारण्यासाठी आलो आहे, असं म्हणत आदित्य यांनी देशमुख यांना मंचावरच मिठी मारली. हे तेच आमदार आहेत, जे गुवाहटीला जाण्यासाठी शिंदे गटाबरोबर गेले. मात्र सूरतहूनच निघून आले. शिंदे गटाने गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं. अकोल्यात आज आदित्य ठाकरे यांनी गद्दार विकले गेले, पण नितीन देशमुख विकले गेले नाहीत, असा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला.

हेही वाचा: या तीन सुखवस्तू युवराजांना 'मराठवाडा' कळेल का?

सभेत बोलताना नितीन देशमुख आणि अरविंद सावंत यांच्या हातात हात घेत, तो उंचावून दाखवत आदित्य यांनी अभिवादन केलं. राज्यातील राजकीय वर्तुळात आज आदित्य ठाकरे यांची ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच मंचावर नितीन देशमुख यांच्या मुलाला आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारला. तुझे बाबा विकले गेले असते आणि 50 खोके मिळाले असते. आजचा दिवस चांगला की खोके चांगले? यावर नितीन देशमुख यांच्या मुलाने आजचा दिवस चांगला असं उत्तर त्याने दिलं आहे. एकूणच गद्दारांविरोधात वातावरणनिर्मिती करण्याची शिवसेनेची मोहीम तेजीत असल्याचंही दिसून आलं आहे.

टॅग्स :Aditya Thackeray