सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोमणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोमणा

मुंबई : बंडखोर आमदारांनी मुंबईत यावे आणि माझ्या डोळ्यात बघून आमचे काय चुकले ते सांगावे. जे गद्दारी करतात, ते कधीच जिंकत नाही. आमचा विश्वास आहे आणि आम्हाला खूप प्रेम मिळत आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले. महाराष्ट्राचा राजकीय पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. (Aditya Thackeray scolds rebels after Supreme Court verdict)

जीव गेला तरी चालेल पण शब्द जाऊ देऊ नका. जे पळून जातात ते कधीच जिंकत नाही. न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय आता वाचावा लागेल. आम्हाला विजयाचा विश्वास आहे. आमदारांना पुढे यावे लागेल. हे राजकारण नव्हे तर सर्कस झाली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: जयंत पाटील म्हणाले, हा महाविकास आघाडीला झटका नाही

खरा वाघ पळून जात नाही, असे रविवारी आदित्य ठाकरे म्हणाले होते. आसाममध्ये तळ ठोकलेल्या आमदारांना त्यांनी कैदी म्हटले होते. ठाण्यात राहून एकनाथ शिंदे यांच्यात बंड करण्याची हिंमत नव्हती. म्हणून ते आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आदित्य ठाकरेही बंडखोरांना तोंड देण्यासाठी रणनीती बनवत आहेत.

Web Title: Aditya Thackeray Scolds Rebels After Supreme Court Verdict

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top