अजित पवारांच्या ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी रिट्विट केला सुप्रिया सुळेंचा 'हा' फोटो

टीम-ई-सकाळ
Sunday, 24 November 2019

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो रिट्विट करत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे आहेत. एक प्रकारे या फोटोतून त्यांनी नवी आघाडी स्ट्राँग आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो रिट्विट करत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे आहेत. एक प्रकारे या फोटोतून त्यांनी नवी आघाडी स्ट्राँग आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

फ्लाय ओव्हरवरुन कोसळली मोटार; थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद (व्हिडिओ)

आदित्य ठाकरे यांनी हा फोटो ट्विट करताना ही आघाडी महाराष्ट्राची ताकद असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून सर्व भाजप नेत्यांचे आभार मानले होते. त्यांनंतर आदित्य यांनी केलेले ट्विट हे चर्चेचा विषय मानला जात आहे.

अजित पवारांनी पद बदलले, पण पक्ष तोच ठेवला

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत साधला संवाद

तसेच, आणखी दोन ट्विट आदित्य यांनी रिट्विट केले आहेत. त्यापैकी एक शिवसेना पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्विट रिट्विट केले आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज आदरणीय शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेऊन विस्ताराने चर्चा केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसरे ट्विट हे आदित्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील केले आहे. त्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांशी शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी एका बैठकीत विस्ताराने चर्चा केली असल्याचे सांगितले आहे. या ट्विटला रिट्विट करत आदित्य यांनी ही महाराष्ट्राची ताकद असल्याचे स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray Tweet supriya Sule Photo After ajit Pawar Tweet