esakal | आदित्य ठाकरेंनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; काय आहे पत्रात
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya-Thackeray

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत लढत असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात सुरवातीलाच केला आहे. संपूर्ण देश आजही जवळपास घरातूनच काम करत असताना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बाहेर पडा म्हणणे हे संकटाला निमंत्रण देणारे असल्याची भीती व्यक्त केली आहे.

आदित्य ठाकरेंनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; काय आहे पत्रात

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन परीक्षा घेणे सध्या टाळावे, असे विनंती पत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत लढत असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात सुरवातीलाच केला आहे. संपूर्ण देश आजही जवळपास घरातूनच काम करत असताना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बाहेर पडा म्हणणे हे संकटाला निमंत्रण देणारे असल्याची भीती व्यक्त केली आहे.

धक्कादायक! खासगी केंद्रातून रेशनकार्ड मिळाल्याने राज्यात खळबळ

अव्यावसायिक अभ्यासक्रमातील मुलामुलींचे मूल्यांकन ज्या प्रमाणे पूर्ण झाले आहे, त्याच धर्तीवर अन्य अभ्यासक्रमांचाही निर्णय घ्यावा. वर्षभरातील कामगिरी तसेच अन्य बाबी लक्षात घेत केवळ १० टक्के मूल्यमापन अंतिम परीक्षेसाठी ठेवावे, अशी विनंतीही पत्रात केली आहे. युवासेनेच्या लेटरहेडवर लिहिलेल्या या पत्रात शैक्षणिक वर्ष ‍ १ जानेवारी २०‍‍‌२१ पासून सुरु करता येईल काय ते पहावे असेही नमूद केले आहे.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top