अलिबाग : ड्रोनद्वारे छायाचित्रण करुन त्याचा वापर देशविघात कृत्यासाठी होण्याची शक्यता असल्याने पुढील दोन महिन्यांसाठी ड्रोन वापरास बंदी घालण्यात आलेली आहे. यापुर्वी ड्रोनद्वारे डेहळणी केली जात असल्याचे प्रकार रायगड पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही खबरदारी घेतली आहे. गणेशविसर्जन दरम्यान ड्रोनचा सर्वाधिक वापर केला जातो. विसर्जन मिरवणुकीसाठीच्या छायाचित्रणासाठीही आता पोलीस अधिक्षकांची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे.