विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! आयटीआयच्या प्रवेशास मुदतवाढ; कधीपर्यंत? वाचा सविस्तर

दिनेश देशमुख 
Tuesday, 11 August 2020

आयटीआय प्रवेश इच्छुक उमेदवारांसाठी संचालनालयाच्या वतीने संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानुसार ऑनलाइन अर्ज भरणे, प्रवेश शुल्क जमा करणे, प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे, प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, प्रवेश फेरी प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. औद्योगिक संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून, प्रवेशाची सविस्तर माहितीपुस्तिका - प्रवेश पद्धती, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती 31 जुलै 2020 पासून प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

बोंडले (सोलापूर) : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात सुधारित वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

हेही वाचा : झेडपीच्या सभेत महिलांची टिंगल! "असले इथे चालणार नाही'; कोणी दिला इशारा? वाचा सविस्तर 

आयटीआय प्रवेश इच्छुक उमेदवारांसाठी संचालनालयाच्या वतीने http:/admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानुसार ऑनलाइन अर्ज भरणे, प्रवेश शुल्क जमा करणे, प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे, प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, प्रवेश फेरी प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. औद्योगिक संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून, प्रवेशाची सविस्तर माहितीपुस्तिका - प्रवेश पद्धती, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती 31 जुलै 2020 पासून प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

हेही वाचा : बापरे..! कोरोनामुक्त झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाचा धोका ! 

सुधारित वेळापत्रक 

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे : प्रारंभ 1 ऑगस्ट ते अंतिम 21 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत 
  • पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे : प्रारंभ 2 ऑगस्टपासून अंतिम 21 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत 
  • प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता 
  • गुणवत्ता यादीतील हरकती नोंदविणे : प्रारंभ 25 ऑगस्ट सकाळी 11 पासून अंतिम ता. 26 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत 
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : 27 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता 
  • पहिली प्रवेश फेरी : 30 ऑगस्ट सायंकाळी पाचपासून 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission to ITI extended till 21st August