रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, राजकीय संस्कारांची कमी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

'या सर्व महिलांनी घालून दिलेल्या संस्कारांची कमी प्रकर्षाने जाणवते'

रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, म्हणाल्या..

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या काही वादग्रस्त आणि टीकायुक्त वक्तव्यांमुळे ओळखल्या जातात. अनेक विषयांना धरुन त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यही केली असल्यानं त्यांना ट्रोलही केलं गेलंय. शिवसेना किंवा महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर त्यांचा रोख असतो तर बऱ्याचवेळा त्यांच्या गाण्यांच्या प्रमोशनसाठी त्या सोशल मीडियावर झळकत असतात. दरम्यान, त्यांच्या याच खळबळजनक ट्विट्सवरून सध्या रोहीणी खडसे यांनी त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. रोहिणी खडसे यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना नाव न घेता राजकीय संस्कारांची कमी प्रकर्षाने जाणवते, असं म्हटंल आहे.

हेही वाचा: राज ठाकरे पुण्यात... पण वसंत मोरे दौऱ्यातून गायब

यासंदर्भात खडसे यांनी ट्विटमध्ये महाराष्ट्राच्या आजवर होऊन कार्यभार स्विकारलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नींची नावे लिहली आहेत. त्या म्हणतात, आज होत असलेली टिका टिप्पणी बघून स्व. वेणुताई चव्हाण, आदरणीय प्रतिभाताई पवार, आदरणीय वैशालीताई देशमुख, सौ. निलमताई राणे, अनघाताई जोशी, उज्वलाताई शिंदे, अमिताताई चव्हाण यांनी घालून दिलेल्या संस्कारांची कमी प्रकर्षाने जाणवते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा: ये भोगी !...शिक आमच्या 'योगीं'कडून, अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी मागील दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरून टीका केली आहे. ये भोगी !...शिक आमच्या 'योगीं'कडून, अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. त्याचा संदर्भ घेत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना योगींकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. अनेकवेळा अमृता फडणवीस या त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ट्रोल होतात. मागील काही दिवसांपूर्वीही त्यांनी असंच एक ट्विट केलं होत. मात्र ते लगचे डिलीट केलं होतं. त्यावरूनही चांगलीच चर्चा रंगली होती.

Web Title: Adv Rohini Khadse Indirectly Criticized To Amruta Fadnavis Former Maharashtra Cm Wife And Tradition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top