ॲड. सदावर्तेंच्या अंगावर शाईफेक! सदावर्ते म्हणाले, उद्धव ठाकरे बिळातील मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचे वयोवृध्द पुढारी शरद पवार, संजय राऊत आणि बिळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या घटनेचा निषेध केला.
ad sadavarte
ad sadavartesakal

सोलापूर : संवाद यात्रेनिमित्त ॲड. गुणरत्न सदावर्ते आज (शनिवारी) सोलापुरात आले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती प्रश्नावर ॲड. सदावर्ते शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत होते. त्यावेळी त्यांच्या मागे थांबलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने अंगावर शाई फेकली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंचा निषेध, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

सध्या सुरू असलेल्या सीमाभागाच्या वादावर ॲड. जयश्री पाटील या उच्च न्यायालयात आपली बाजू मांडतील, यासंदर्भात ॲड. सदावर्ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी मराठा समाजाचा एक तरूण हॉटेलमध्ये आला आणि ‘जाहीर निषेध जाहीर निषेध’ अशी घोषणाबाजी करू लागला. त्याचवेळी पत्रकार परिषदेपूर्वी हॉटेलमध्ये उपस्थित संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सोमनाथ राऊत यांनी ॲड. सदावर्ते यांच्या अंगावर शाई फेकली. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू दिले जाणार नाही, त्यांची अशीच गत केली जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी त्यांनी केली.

ॲड. सदावर्ते म्हणाले...

राष्ट्रवादीचे वयोवृध्द पुढारी शरद पवार, संजय राऊत आणि बिळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या घटनेचा निषेध केला. त्यांच्या पिलावळांना आम्ही घाबरणार नाही असे म्हणत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार व मावळे असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा घटनांमुळे मला काहीच फरक पडणार नाही, माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असेही ॲड. सदावर्ते म्हणाले.

ठळक बाबी...

  • संवाद यात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. गुणरत्न सदावर्तेंवर फेकली शाई

  • सीमावर्ती प्रश्नावर ॲड. जयश्री पाटील बाजू मांडतील, यासंदर्भात ते बोलत होते

  • सोलापुरातील एका हॉटेलमध्ये ॲड. सदावर्तेंची पत्रकार परिषद होती

  • संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध केला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com