''महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर...''

कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
bhagat singh koshyari
bhagat singh koshyariSakal media

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे असे, भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी म्हटले असून, आता या प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत कोश्यारी यांच्या विधानावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. (Yashomati Thakur Tweet On Governor Koshyari Statement)

''वयाच्या आणि अधिकाराच्या या टप्प्यावर एखाद्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसावा हे न पटण्यासारखं आहे. जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास (History) पसरवण्याचा उद्योग संघ (RSS) परिवार अनेक वर्षे करत आला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर महाराष्ट्र माफ करणार नाही.'' अशा शब्दात यशोमती ठाकून यांनी कोश्यारी यांच्यावर ट्वीट करत निशाणा साधला आहे.

bhagat singh koshyari
सावध पवित्रा! व्यावसायिक उड्डाणांवर बंदी कायम, DGCA ने जारी केले आदेश

उदयनराजेंकडून वक्तव्य मागे घेण्याची विनंती

उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांना वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाचे नेते आणि आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यपालांना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलंय.

राज्यपालांचा जावईशोध!

काल राज्याचे राज्यपाल यांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते. (Vinod Patil speaks on governor koshyari)

bhagat singh koshyari
Ukraine Russia War LIVE : युक्रेनमध्ये आतापर्यंत ३७६ जणांचा मृत्यू

'तत्काळ उचलबांगडी करा..नाहीतर धोतर काढू'

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही.

इशारा समजा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com