वकील सतीश उके यांना 6 एप्रिलपर्यंत ED कोठडी; न्यायालयाचा मोठा निर्णय

Advocate Satish Uke
Advocate Satish Ukeesakal
Summary

सतीश उके यांच्या नागपुरातील राहत्या घरी ईडीनं काल धाड टाकली होती.

प्रसिद्ध आणि बहुचर्चित वकील सतीश उके (Satish Uke) यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच, ईडीनं नुकतीच अटक केलीय. वकील सतीश उके यांच्या नागपूर येथील राहत्या घरी ईडीनं गुरुवारी (31 मार्च) सकाळी धाड (ED Raid) टाकली होती. या वेळी ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर जवळपास दिवसभर चौकशी केल्यानंतर सांयकाळच्या सुमारास ईडीनं त्यांना अटक (Advocate Satish Uke Arrested By ED) केली. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खटले दाखल करणारे नागपूरचे वकील सतीश उके यांना न्यायालयानं 6 एप्रिल 2022 पर्यंत ED कोठडी दिल्याचं समजतंय.

एका जमीन घोटाळ्याच्या आरोपात वकील सतीश उके यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र, नेमकी जमीन घोटाळ्याशी संबंधितच ही कारवाई आहे की, आणखी काही वेगळे प्रकरण आहे याबाबत पुरेशी माहिती पुढं आली नाहीय. सतीश उके हे नागपूरमधील प्रसिद्ध वकील आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेमुळं सतीश उके सर्वाधिक चर्चेत आले.

Advocate Satish Uke
'कोल्हापुरात जयश्री जाधवांचा विजय ही काळ्या दगडावरील पांढरी रेष'

दरम्यान, देवेंद्र फडणवीस याच्याविरोधातील याचिकेसोबतच कथित फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या याचिकेचंही वकीलपत्र उके यांच्याकडं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच हे फोन टॅप झाले, असा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळं हायप्रोफाईल वकील अशी ओळख असलेल्या उके यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळं सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. त्यातच आज न्यायालयानं सतीश उके यांना 6 एप्रिल 2022 पर्यंत ED कोठडी सुनावलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com