Ajit Pawar : अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल; 'हे' आहे कारण

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल; 'हे' आहे कारण
Updated on

नवी दिल्लीः राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? यासंबंधीचा पेच निर्माण झालेला आहे. शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पहिली सुनावणी पार पडली. त्या सुनावणीसाठी स्वतः शरद पवार आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष यासंबंधीचे पुरावे दोन्ही गटाकडून सादर करण्यात आले.

शुक्रवारीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. सत्तापक्षासोबत गेलेल्या ज्या आमदारांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली आहे, ती लवकर निकाली काढावी, यासाठी जयंत पाटलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल; 'हे' आहे कारण
लेजर बीम विरोधात जनहित याचिका दाखल होणार

दुसरीकडे अजित पवार गटानेही सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी 'एबीपी माझा'च्या सूत्रांना ही माहिती दिली. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार गटाने पक्षचिन्हासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली तर निर्णय देण्याआधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलीय.

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल; 'हे' आहे कारण
Supriya Sule: वयाने मोठे आहात नाहीतर करारा जवाब दिला असता, सुप्रिया सुळेंचा भुजबळांना इशारा!

खबरदारीचा उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयात अजित पवार गटाने कॅवेट दाखल केलेलं आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्याच घडामोडी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत आहेत. शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधी कोर्टात जाण्याची शक्यता आहे. म्हणून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com