२०१४ नंतर सावरकरांना सतत टार्गेट केलं जातंय: शरद पोंक्षे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad ponkshe esakal news

२०१४ नंतर सावरकरांना सतत टार्गेट केलं जातंय: शरद पोंक्षे

पुणे: मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांना त्यांच्या नथुराम-सावरकर प्रेमासाठी ओळखलं जातं. त्यांनी आज सावरकरांविषयी महत्त्वाची विधाने करताना म्हटलंय की, २०१४ नंतर सावरकरांना सतत टार्गेट केलं जात आहे. दुसरं कुठलंच नाव येत नाही. हिंदुत्ववादी अनेक नेते होऊन गेले पण त्यांना टार्गेट केलं गेलं नाही. मात्र, सावरकरांनाच जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

पुढे त्यांनी म्हटलंय की, सावरकरांनी एक कणभरही हिंदुत्वाला तिलांजली दिली नाही. हिंदुत्वाच्या भल्यासाठी मी काम करीत राहणार अशीच सावरकरांची भूमिका होती. बाकी इतर हिंदुत्ववाद्यांनी राजकारणासाठी कुठंतरी तोडजोडी केल्या, हिंदुत्वासाठी तडजोड केल्या. पण सावरकरांनी नाही केली.

ते म्हणाले की, सावरकर हे भारतरत्नच नाहीत तर विश्वरत्न आहेत. मात्र, सावरकरांवर शिंतोडे उडवायचे असं करुन सावरकरांना बदनाम केलं जात आहे. ८० टक्के हिंदूंना दुखवायचे असेल तर सावरकरांना बदनाम करायचे, हे काम सुरू आहे.

हेही वाचा: राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे

संभाजी ब्रिगेडबद्दल बोलताना ते म्हणाले की, संभाजी ब्रिगेड ही जी संस्था आहे, त्यांच्या नावातच छत्रपती नाही, मग आम्ही शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांना नुसतं शिवाजी म्हणलो की ते समोर येतात.

पुढे ते म्हणाले की, कट्टरता हिंदूंमध्ये येऊ शकत नाही. जिथं नियम येतात, घटना येते तिथं कट्टरता येते. हिंदू धर्मामध्ये ही भानगड नाही. कारण मुळात धर्म आहे. इतर धर्मसंस्था आहेत. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार धर्मसंस्थांची निर्मिती केली. देवाला शिव्या देणारा, नास्तिक असतानाही तो हिंदूच असतो.

loading image
go to top