अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब; सोमय्यांचे सूचक वक्तव्य

सोमय्यांच्या नव्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ, चर्चांना उधाण
Political News
Political Newsesakal
Updated on
Summary

सोमय्यांच्या नव्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ, चर्चांना उधाण

मागील अनेक दिवसांपासून भाजपाचे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा दावे केले आहेत. त्यानुसार त्यांनी पुरावे सादरही केले आहेत. याप्रकरणी आघाडीतील अनेक नेते आणि किरीट सोमय्यांचे (Kirit somaiya) या घोटाळ्यांवरून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत असताना सध्या चर्चेत असलेले अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. दरम्यान, आता सोमय्या यांनी आणखी एक ट्वीट करत पुढील नाव अनिल परब (Anil parab) असे म्हणत परिवहन मंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.

Political News
काय स्वस्त, काय महाग? बजेटचा तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?

ट्वीट करत त्यांनी अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब असे म्हणत, परिवहन मंत्र्यांवर रोख धरला आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas aaghadi Sarkar) बड्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचे दावे केले आहेत. त्या त्या वेळेस हे दावे खरे नसून मानहानी असल्याचा आरोपही सोमय्या यांच्यावर झाला आहे. आता या ट्वीटमुळे पुढील रोख अनिल परब यांच्यावर असणार का ? असेल तो कोणता असू शकतो? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (sitaram kunte) यांना ईडीनं समन्स (enforcement directorate summons) बजावल्यानंतर ईडी कार्यालयात अनिल देशमुख यांची चौकशाही (investigation in ED office) करण्यात आली होती. यानंतर अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे असा जबाब सिताराम कुंटे यांनी ईडीकडे नोंदवला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे बहुतांश निर्णय हे देशमुखच घेत होते. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून ४० कोटी रुपये घेतल्याचे अटकेतील आरोपी सचिन वाझे यांनी ईडी समोर कबूल केले असल्याचे कुंटे यांनी सांगितले आहे.

Political News
Union Budget 2022 : आता दोन वर्षात 'इन्कम टॅक्स रिटर्न' करता येणार अपडेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com