उदयनराजेंची राष्ट्रवादीच्या नेत्याला मिठी मारून दिली चुकल्याची कबुली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सातारा येथील भिवडी गावातील कार्यकर्त्याच्या लग्नात माजी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट झाली. त्यावेळी उदयनराजेंनी येऊन मला मिठी मारली. सॉरी चुकलो असं दोन वेळा ते म्हणाले, मी त्यावर काही प्रतिसाद दिला नाही असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

सातारा : सातारा येथील भिवडी गावातील कार्यकर्त्याच्या लग्नात माजी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट झाली. त्यावेळी उदयनराजेंनी येऊन मला मिठी मारली. सॉरी चुकलो असं दोन वेळा ते म्हणाले, मी त्यावर काही प्रतिसाद दिला नाही असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पुढे शिंदे म्हणाले की, मी उदयनराजेंना म्हणालो की, तुम्ही स्वत:चे नुकसान करुन घेतले आणि माझेही केले. २० वर्षाच्या राजकारणात माणूस कष्ट करुन निवडून यायला जातो त्यावेळेस आज जर निवडून आलो असतो तर पवारसाहेबांनी खूप मोठी संधी दिली असती. त्याला मुकलो आहे अशी खंत व्यक्त केली. तसेच तुम्ही स्वत:चे आणि माझे फार मोठे राजकीय नुकसान केलेले आहे. त्यामुळे आता सॉरी बोलून फायदा नाही.'

शिवसेनेला मोठा झटका; 400 जणांचा एकसोबत भाजपत प्रवेश

आता त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे ज्या अश्रू आले वैगेरे बातम्या आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेसोबत ठाम आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आतापर्यंत मी पार पाडत आलो आहे. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आणि मी माझ्या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया दिली. एवढ्यापुरतीच ही भेट मर्यादित होती असा खुलासाही नंतर शशिकांत शिंदे यांनी दिला ट्विटरवर केला आहे.

दरम्यान, शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात काम करत आहे अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे. उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला होता. यावेळी शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजेंना थांबविण्यात शिंदेंना अपयश आले. निवडणुकीत मात्र दोघांचाही आपल्या-आपल्या मतदारसंघातून पराभव झालेला पाहायला मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after defeat in Satara Loksabha elections udayanraje said sorry to shashikant shinde