esakal | शिवसेनेला मोठा झटका; एकसोबत ४०० जणांचा भाजपत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

400 Hundred Shivsena Party Workers enter in BJP

राज्यात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे नविन मुख्यमंत्री झाले. तरी मात्र मुंबईत शिवसेनेला मोठा झटका बसला असून एकसोबत ४०० जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

शिवसेनेला मोठा झटका; एकसोबत ४०० जणांचा भाजपत प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे नविन मुख्यमंत्री झाले. तरी मात्र मुंबईत शिवसेनेला मोठा झटका बसला असून एकसोबत ४०० जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाले आहेत. धारावी येथील ४०० शिवसैनिकांनी पक्षाला थेट रामराम करत भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भ्रष्ट आणि विरोधी पक्षासोबत शिवसेनेने हातमिळवणी केली असल्याचे सांगत या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागरिकत्व दुरुस्ती येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर

हिंदू पक्षाविरोधात शिवसेनेने हातमिळवणी केल्याने आम्हाला स्वत:ला फसवणुकीची भावना निर्माण झाली. फक्त सत्तेसाठी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली असल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला आहे. मागील ७ वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढत आहोत. निवडणुकीच्या काळात आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागितली. पण आता त्यांना कोणतं तोंडाने सामोरे जाणार? आम्ही प्रामाणिकपणे लोकांकडे मतं मागितली होती अशा शब्दांत या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराचा तर भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. काही शिवसैनिकांनी सामुहिक राजीनामेही दिले होते. मात्र, निकालानंतर वेगळीच गणिते आकारास आली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. नेमका हाच मुद्दा काही शिवसैनिकांना आवडलेला नाही.

loading image