
Ruta Awhad : 'रोज एक नवा ड्रामा...',आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नींची प्रतिक्रिया
Jitendra Awhad Latest News : ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्यापप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर सात समर्थकांविरोधात नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये होता.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही वर्तक नगर पोलीस ठाण्यात महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ऋता यांनी पोलिसांना आहेर यांच्याविरोधातील सर्व पुरावे आणि कथित ऑडिओ क्लिपही दिली आहे. तसेच आता पोलीस काय कारवाई करणार हे आम्ही पाहत आहोत, असं आव्हाड यांच्या ऋता आव्हाड यांनी म्हटलं आहे.
ऋता आव्हाड आणि नताशा आव्हाड यांनी रात्री उशिरा वर्तक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी कथित ऑडिओ क्लिपद्वारे आमच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याविरोधात आम्ही आहेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो असल्याचंही ऋता आव्हाड यांनी सांगितलं आहे.
तर पुढे बोलताना ऋता आव्हाड म्हणाल्या की, आमच्याकडे पुरावा आहे. पोलीस काय कारवाई करणार हे आम्ही पाहणार आहे. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. शस्त्र कुणाकडे होते हे सर्वांनी पाहिलं आहे. हल्ला झाला आहे तेव्हा आव्हाड समर्थकांकडे शस्त्र नव्हते. उलट रिव्हॉल्वर कुणाकडे होतं हे ही सर्वांनी पाहिलं आहे. हल्ला कधी झाला हे आव्हाड यांना माहीती नसल्याचा दावा ऋता आव्हाड यांनी केला आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहाय्यक आयुक्तांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले होते. आम्हीही जनता आहोत. तुम्ही सर्व प्रजेला समान वागणूक दिली पाहिजे. तरच तुम्हाला राजा म्हणायला आनंद होईल. थोबाडीत मारल्याने 307 गुन्हा दाखल करण्यात आला. लोकांच्या घराला आगी लावून मारलं जात. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. रोज एक नवा ड्रामा तयार होत आहे, असं त्या म्हणाल्या.