Mumbai Rain : मुंबई तुंबल्यावर मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भर पावसात CM शिंदें उतरले फील्डवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोस्टल रोडची पाहणी
Mumbai Rain
Mumbai RainEsakal
Updated on

काल शनिवारी मुंबई सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. तर पुढील 5 दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पहिल्याच पावसाने मुंबईची दैना झाली. कालच्या पावसाचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. (Latest Marathi News)

तर भर पावसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोड येथे जाऊन पाणी साचण्याच्या कारणे जाणून घेतली. तसेच येथील परिस्थितीची पाहणी केली. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले आहेत. आज जरी याठिकाणी पाणी नसले तरीही काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर जलमय झाल्यामुळे येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली आहे.(Latest Marathi News)

तर यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, सकाळपासून मी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाची पाहणी करत आहे. सुरुवातीला मी वरळी पोस्टल रोडची पाहणी केली. त्या ठिकाणी काम कुठपर्यंत आले आहे. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते आहे का हे पाहून मी आता सांताक्रूझ मिलन सबवे या ठिकाणी आलेलो आहे.

या ठिकाणी दरवर्षी पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी व्हायची ती दिलेल्या सूचनांची पूर्तता केल्यानंतर आता वाहतूक सुरळीत रित्या सुरू आहे. ज्या ठिकाणी कामाची योग्य अंमलबजावणी होणार नाही त्या ठिकाणी निश्चित कारवाई करू मात्र प्रत्यक्षदर्शी तशी कुठलीही गोष्ट ही निदर्शनास आलेली नाही त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाहीये असं शिंदे म्हणालेत.

Mumbai Rain
Mumbai Rain: मुख्यमंत्री महोदय…. कोणी गाडीच्या टपावर..तर कोणी गाडीला ठेवले बांधून..मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार Video Viral

पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहील आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या नालेसफाईवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या भोंगळ कारभाराला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील प्रमुख नाल्यांची सफाईची पाहणी केली होती.(Latest Marathi News)

Mumbai Rain
Mumbai Rain Video : मुंबईत पावसाचं थैमान; महिला वाहून जाता जाता वाचली; थरारक दृश्ये कॅमेऱ्यात कैद

नालेसफाई झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच मुंबईकरांना कसलाही त्रास होणार नाही असं आश्वासन मुख्यंमत्र्यांनी दिलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नालेसफाई चांगल्या प्रकारे केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हंटले होते.(Latest Marathi News)

मान्सूनपूर्व पावसाने मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाळे काढल्याचे चित्र पहिल्याच पावसामुळे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फेल झाल्याचे चित्र दिसत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश भोसले यांनी म्हटले आहे.(Latest Marathi News)

Mumbai Rain
Maharashtra Rain: मुंबईची झाली तुंबई अन् CM शिंदे म्हणातायत, “अरे बाबा स्वागत करा की…”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com