राज्यपालांच्या भूमिकेनंतर आम्ही निर्णय घेऊ : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 November 2019

राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे आमचे लक्ष असून राज्यपालांच्या भूमिकेनंतर आम्ही निर्णय घेऊ, राज्यपाल कोणतं पाऊल उचलतात हे पाहणे महत्वाचं असे महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. कौल पाहता, भाजप शिवसेनेनं सरकार स्थापन करायला हवं, असंही मत थोरात यांनी व्यक्त केले.

मुंबई : राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे आमचे लक्ष असून राज्यपालांच्या भूमिकेनंतर आम्ही निर्णय घेऊ, राज्यपाल कोणतं पाऊल उचलतात हे पाहणे महत्वाचं असे महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. कौल पाहता, भाजप शिवसेनेनं सरकार स्थापन करायला हवं, असंही मत थोरात यांनी व्यक्त केले.

बापरे ! दीपिकाच्या बॅगची किंमत ऐकुन तुम्हीही व्हाल थक्क

युतीतल्या संघर्षानंतर काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

अयोध्या प्रकरण : सावधान! आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि मेसेज पाठविला तर...

शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटावर कोणी बोलत नाही, तो मुद्दा महत्वाचा आहे. पाच वर्षात एकही पायभूत काम या सरकारनं केलेले नाही. जनतेने फडणवीस सरकारला नाकारल्याचे यातून स्पष्ट झालं आहे. कितीही प्रयत्न केले तरी आता राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असे मत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the Governors role we will decide says Balasaheb Thorat