'ईडी'च्या चौकशीनंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया...

टीम ई-सकाळ
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयातून आता बाहेर आले आहेत. त्यानंतर आता ते त्यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज'वर दाखल झाले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयातून आता बाहेर आले आहेत. त्यानंतर आता ते त्यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज'वर दाखल झाले आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कितीही चौकशी झाली तरी तोंड बंद ठेवणार नाही. 

'कोहिनूर' प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आज बोलविण्यात आले होते. सकाळी साडेअकरापासून त्यांची 'ईडी'कडून चौकशी करण्यात आली होती. तब्बल साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे यांना सोडण्यात आले. त्यानंतर आता ते कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत.

त्यानंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कितीही चौकशी झाली तरी तोंड बंद ठेवणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After inquiry of ED Raj Thackeray gives First Comment on it