
"रोजगाराचे प्रश्न तर इफ्तार पार्टी.."; शरद पवारांना फडणवीसांचा टोला
मुंबई : आज मुंबईतील सोमय्या मैदनात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुस्टर डोस सभेत बोलताना शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. त्यांनी सरकारला पेट्रोलवरील कर कमी करत सामान्यांना दिलासe देण्याची मागणी यावेळी केली.
राज्यात सुरू असलेल्या हनुमान चालिसा प्रकरणावर बोलताना फडणवीस यांनी शरद पवार यांना देखील टोला लगावला. फडणवीसा म्हणाले की, पवार साहेब म्हणतात हनुमान चालिसा म्हटल्याने रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत का? रोजगाराचे प्रश्न तर इफ्तार पार्टी झोडल्यानेही सुटणार नाहीयेत. पण रोजगाराचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्यात उद्योग आले पाहिजेत आणि त्यासाठी राज्यात विज असायला हवी पण लोडशेडींग असलेल्या राज्यात कोण उद्योग घेऊन येणार आहे, असा सवाल केला.
पुढे बोलताना फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधात सरकारने, कोरोना काळात सरकारने कोणालाही मदत केली नाही, मदत कोणाला केली तर मुंबईच्या बिल्डरांना, त्यांची हाजारो कोटींची स्टँप ड्यूटी आणि प्रिमीअम सरकारने रद्द केला. बार चालकांची लायसन्स फी बंद केली. इंग्रजी दारू वरचा टॅक्स पन्नास टक्के कमी केला, असे सांगतानाच फडणवीस म्हणाले की मात्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स कमी केला नाही. ते म्हणाले की, तुम्ही ३५ रुपयांचा टॅक्स पेट्रोलवर घेताय, तो १५ रूपये कमी करा आणि सामान्यांना सवलत द्या अशी मागणी त्यांनी केली. भाजपच्या सगळ्या राज्यांनी केलं ना मग तुम्हाला काय अडचण आहे, असा सवाल देखील फडणवीस यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना मागच्या वर्षी ४० हजार कोटी केंद्रानं जीएसटीपोटी केंद्र सरकारने दिले यावेळी २६ हजार कोटी द्यायचे होते १३ हजार कोटी दिले, बाकी ऑगस्ट पर्यंत १३ हजार कोटी देणार आहे. हे सरकार कोणासाठी काम करतंय. बिल्डरांसाठी, बेवड्यांकरीत काम करतंय, की सामान्य लोकांकरीता काम करतंय असा माझा सवाल आहे.
वर्क फ्रॉम जेल पहिल्यादाच पाहिलं
महाराष्ट्र दिनी हे महाराष्ट्राचे गोडवे गात आहेत पण यांचे दोन मंत्री जेलमध्ये आहेत, कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले आणि त्या निर्णयावर नवाब मलिकांचा फोटो छापला, मुख्यमंत्र्याचं वर्क फ्रॉम होम पाहिलं, पण वर्क फ्रॉम जेल पहिल्यादाच पाहायला मिळतंय, अशी महाराष्ट्राची आवस्था झाली आहे असे फडणवीस म्हणाले.