
"तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही"; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आज घाटकोपर येथील सोमय्या मैदानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे, या सभेत बोलताना म्हणाले की, मशीदीवरील भोंगे काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली, अशा शब्दात फडणवीसांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
बाबरी मशिदीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, हिंदू कधी मशिद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. तो ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होता. याच राम मंदिरासाठी सेन्ट्रल जेलमध्ये मी १८ दिवस घालवले आणि तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवाल फडणवीस यांनी शिवसेनेला केला आहे.
काही लोकांचा गैरसमज आहे ते म्हणजेच महाराष्ट्र , तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, १८ पगड जातीच्या लोकांनी बनलेला महाराष्ट्र आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. मला हिंदूची संख्या कमी करायची नाही. पण तुम्ही म्हणजे हिंदूत्व नाही, असे देखील फडणवीस म्हणाले. बाबरी मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि हे म्हणतात आम्ही बाबरी ढाचा पाडला हे आभमानानं सांगतो. तेव्हा महाराष्ट्रातील तुमचा कोणता नेता गेला होता. जे ३२ आरोपी होते ते कोण होते? त्यामध्ये तुमचा कुठला नेते होते असा प्रश्न फडणवीस यांनी केला.
कारण तेव्हा गरज होती..
फडणवीस पुढे आता महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हटलं तर राजद्रोह होतो. माझा तुम्हाला सवाल आहे की तुम्ही रामाच्या की रावणाच्या बाजूचे आहात याचा निकाल तुम्ही लावा. काश्मीरमध्ये म्हणतात तुम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत गेले. हो आम्ही गेलो कारण तेव्हा गरज होती. पाकिस्ताननं म्हटलं होतं की तिथं निवडणुका होऊ देणार नाही. पण आम्ही सरकार स्थापन करुन दाखवलं.जेव्हा आमचं काम झालं तेव्हा त्याच मेहबुबा मुफ्तींचं सरकार खाली खेचण्याचं काम आम्ही केलं.
भाजपच्या पोलखोल मोहिमेची सांगता आज मुंबईतील सोमय्या मैदनावर बुस्टर डोस सभेच्या माध्यमातून होत आहे, या वेळी भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकरत्यांना संबोधित केलं. या सभेत फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या पोलखोल अभियानाचा समारोप होणार आहे. तसेच या सभेत देवेंद्र फडणवीस हे पालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेला लक्ष्य करू शकतात, अशी चर्चा देखील सुरू होती.