जुन्या नोटांचं काय करायचं? तीन वर्षांनंतरही बँकांपुढे प्रश्न कायम!

Demonetization
Demonetization
Updated on

पुणे : केंद्र सरकारने एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून तब्बल तीन वर्षे लोटली, तरीही देशातील जिल्हा बँकांमधील सुमारे ६२८ कोटींच्या जुन्या नोटा बदलून मिळण्याबाबतचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. या बँकांमधील शिल्लक राहिलेल्या या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने त्या तशाच धूळखात पडल्या आहेत.

राज्यातील आठ बँकांचे ११२ कोटी धूळ खात पडून   

यामध्ये राज्यातील आठ बँकांमधील ११२ कोटींच्या जुन्या नोटांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) २२ कोटी २९ लाख रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा बँकेसह देशातील बहुतांश जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहेत.

राज्यातील आठ जिल्हा बँकांमध्ये पुणे, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नागपूर, अमरावती आणि वर्धा या बँकांचा समावेश होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gold Theft
solapur zp
Maharashtra TET Result
Viral Videos Expose Alleged Abuse at Bengaluru Daycare; Five Caretakers Face Police Action
Marathi News Esakal
www.esakal.com