Shivsena: बावनकुळेंच्या युटर्ननंतर ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितला शिवसेनेच्या जागा वाटपाबाबतचा फॉर्म्युला

बावनकुळेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटीलांनी भाजपची जागा वाटपाबाबतची भूमिका केली स्पष्ट
Devendra Fadnavis and Eknath Shinde
Devendra Fadnavis and Eknath ShindeEsakal

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा तर शिवसेना (शिंदे गट) 48 जागा लढवणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं. त्यानंतर बावनकुळे यांचा तो व्हिडीओ सोशल मिडीयावरुन हटवण्यात आता यावर भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप मागील काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुकीची तायरी करत आहे. त्यात शिवसेनेला किती जागा जातील हे आतापासून ठरवण्याचे कारण नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुकीची तयारी करत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. त्यात शिवसेनेला किती जागा जातील हे आतापासून ठरवण्याचे कारण नाही. आमची तयारी शिवसेनेला उपयोगी पडेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा सत्ता पलटणार? बच्चू कडूंचं सूचक विधान

काय म्हणाले होते भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत मोठे वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युल्याबाबत जागावाटप सांगितलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी भाजप 240 जागा लढवणार तर 48 जागा शिवसेनेला देणार असल्याचे सांगितलं. त्यानंतर बावनकुळेंच्या वक्तव्याने युतीत वाद निर्माण होऊ नये म्हणून भाजपने भाषणाचा व्हिडीओच सोशल मीडियावरुन हटवला आहे.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Lalbaug Murder: लालबाग हत्याकांडात नवा ट्विस्ट! आईचा शिडीवरून पडून मृत्यू, नंतर शरीराचे तुकडे अन्...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं सूचक विधान

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे की, चुकून त्यांनी वक्तव्य केलं हे तपासलं पाहिजे. आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची, नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार त्याचं अजून काही ठरलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे अडचणीत वाढ; दिल्ली पोलीसांची निवासस्थानी धडक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com