लसीकरणानंतर बिघडली विद्यार्थ्याची प्रकृती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

सोलापूर : औजजवळील आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (वय 9) या विद्यार्थ्याला 7 डिसेंबर रोजी लस टोचण्यात आली होती. परंतु, काही तासांनंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला आज पहाटे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रुग्ण बालकाची पाहणी केली व कुटुंबीयांकडून माहिती जाणून घेतली. आहेरवाडी प्राथमिक शाळेतील 98 मुलांना 7 डिसेंबर रोजीच लस दिली होती. मात्र, सांयकाळी साडेपाचच्या सुमारास ऋषिकेशला उलटी झाली. त्या वेळी आरोग्य पथकाने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

घरी परतल्यानंतर पुन्हा त्याला उलटी झाली म्हणून त्याला तत्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, ऋषिकेशचा ताप वाढला आणि त्याची प्रकृती बिघडली असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले असून, तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून त्याच्या प्रकृतीची पाहणी केली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे 35 विद्यार्थ्यांना आतापर्यंत लसीकरणानंतर भोवळ आल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
Web Title: After the vaccination the condition of the student is bad