कृषीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

प्रवेश अर्जासाठी 20 जुलैपर्यंत मुदत; राज्यातील 93 महाविद्यालयांत 1 हजार 981 जागा उपलब्ध

प्रवेश अर्जासाठी 20 जुलैपर्यंत मुदत; राज्यातील 93 महाविद्यालयांत 1 हजार 981 जागा उपलब्ध
नाशिक - कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 2018-19 च्या प्रवेशासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गतच्या 93 महाविद्यालयांतील 1 हजार 981 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. 20 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत आहे.

महात्मा फुले (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा (परभणी) व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण (दापोली) या कृषी विद्यापीठांतून पदविका अभ्याक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी आहे. त्यासाठी केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. अशा विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी दुसऱ्या वर्षाच्या 20 टक्‍के अतिरिक्‍त जागा महाविद्यालयात उपलब्ध केल्या आहेत. प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. इच्छुकांना "केटीपीएल'च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल.

प्रवेशासाठी उपलब्ध जागा
प्रकार महाविद्यालय संख्या उपलब्ध जागा

अनुदानित 18 391
विनाअनुदानित 75 1590
एकूण 93 1981

Web Title: Agricultural Degree course admission time table