कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीयेला 22 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ | Agricultural university update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीयेला 22 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील कृषी व कृषी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालय (Agriculture college) आणि विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या (degree syllabus) केंद्रीभूत प्रवेशासाठी प्रवेश अर्ज नोंदणीकरिता (Admission application) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने मुदतवाढ दिली असून नवीन सुधारित वेळापत्रक (timetable) आज जारी केले आहे.

हेही वाचा: ख्रिसमस, नवीन वर्षाच्या तोंडावर कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना

अमरावती जिल्ह्यात संचारबंदी व इंटरनेट सेवा बंद असल्याने या जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांना या प्रवेशासाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली. राज्यात कृषी आणि संबंधित पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी 5 नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी मुदत संपली होती. परंतु अमरावती जिल्ह्यात संचारबंदी आणि परिसरात इंटरनेट सेवा बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही त्यामुळे 22 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

असे आहे सुधारीत वेळापत्रक

कार्यक्रम सुधारीत तारखा

ऑनलाई अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे २२ नोव्हेंबर

अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध २६ नोव्हेंबर सायं. ५.३० नंतर

आलेल्या तक्रारीची यादी प्रसिद्ध २७ नोव्हेंबर सायं. ५.३० पर्यंत

अंतिम गुणवता यादी प्रसिद्ध ३ डिसेंबर सायं. ५.३० नंतर

पहिल्या प्रवेश फेरीची यादी ६ डिसेंबर सायं. ५.३० नंतर

दुसऱ्या प्रवेश फेरीचे वाटप यादी ११ डिसेंबर सायं. ५.३० नंतर

तिसऱ्या प्रवेश फेरीचे वाटप २० डिसेंबर सायं. ५.३० नंतर

रिक्त जागांवरील प्रवेश फेरी २४ डिसेंबर

संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरणे २८ डिसेंबर

वर्ग सुरू होण्याची तारीख २७ डिसेंबर

प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम तारीख २० डिसेंबर

loading image
go to top