‘कृषी’साठी आजपासून प्रवेशप्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

पुणे - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस उद्यापासून (ता. ११) प्रारंभ होत आहे. पाच जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सुमारे १५ हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली  जात आहे. 

अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, तसेच महाविद्यालयांचे विकल्प भरून संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहेत. प्रवेशप्रक्रियेतंर्गत एकूण चार ऑनलाइन प्रवेश फेऱ्या होणार असून, उर्वरित रिक्त जागा ‘जागेवरील प्रवेश फेरी’द्वारे भरण्यात येतील.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात www.dtemaharashtra.gov.in / www.mcaer.org / mahaagriadmission.in  या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सदस्य रवींद्र जगताप यांनी दिली. 

राज्यात चार कृषी विद्यापीठांमध्ये दहा विद्याशाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. 

या अभ्यासक्रमाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत ७१, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) ३६, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) ५४ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) २६ अशी एकूण १८७ महाविद्यालये आहेत.

 वेळापत्रक 
प्रवेश प्रक्रियेस सुरवात : ११ जून
ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची अंतिम मुदत : ५ जुलै
संकेतस्थळावर अंतरिम गुणवत्ता यादी : १३ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी - २३ जुलै
पहिली प्रवेश फेरी - २६ जुलै
दुसरी प्रवेश फेरी - ३ ऑगस्ट
तिसरी प्रवेश फेरी - ९ ऑगस्ट
चौथी फेरी : १६ ऑगस्ट

पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता : १५ हजार २२७ (प्रथम वर्ष) : चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम
कृषी महाविद्यालयांची एकूण संख्या : १८७ (शासकीय महाविद्यालये-३१, अनुदानित -२, कायमस्वरूपी विना अनुदानित - १५४)

Web Title: Agricultural University today admission start