‘शेती उत्पन्नवाढीसाठी मिळाली नवी दिशा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

औरंगाबाद - दुष्काळातही पीक, पाणी व्यवस्थापन करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गटशेती हाच उत्तम पर्याय असल्याची नवी दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादातून मिळाल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीद्वारे (एमएसएसडीएस) शेतकऱ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना गटशेतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

‘कौशल्य विकासाने क्रांती’
लातूर - आम्ही शेती करण्यास तयार आहोत, तसे आमचे प्रयत्नही सुरू आहेत; पण शेतीत नफा कमावताना खूप काबाडकष्ट करूनही फारसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासाने शेतीत क्रांती घडेल, असा विश्वास नांदगावचे शेतकरी संतोष गर्जे यांनी व्यक्त केला. या वेळी शहरातील डीपीडीसी सभागृहात हरंगूळ मंडळातील दोनशेपेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते. 

‘मी गेल्या तीस वर्षांपासून फुलांची शेती करतोय. आता सेंद्रिय शेतीकडे वळलो आहे. त्यासाठीही ही नवीन गटशेतीची योजना अधिक लाभदायी आहे; मात्र सरकारने गटशेतीसाठी अनेक योजना दिल्या पाहिजेत. याने शेतीत क्रांती घडेल,’ अशी प्रतिक्रिया पाखरसांगवीच्या हरंगूळ खुर्दमधील महिलांनीही या गटशेतीद्वारे सेंद्रिय शेती सुरू केली आहे. यातील श्रीदेवी स्वामी म्हणाल्या, की या गटशेतीने आम्हा महिलांना घरातील व्यवहारात पुन्हा निर्णायक भूमिका पार पाडण्याची संधी मिळणार आहे. रंजना पवार म्हणाल्या, की घराघरांतील व्यक्तींनी आणि गावातील नातेवाइकांनी या गटशेतीद्वारे एकत्र आले पाहिजे आणि नेमके हेच या नवीन योजनेद्वारे होईल. हरंगूळ खुर्दमधील मोहन पाटील म्हणाले, की भाजीपाला पिकांसाठी ही गटशेती अधिक महत्त्वाची आहे. नांदगावचे शेतकरी आनंद पाटील म्हणाले, की या गटशेतीचा अधिक लाभ दुग्धव्यवसायातही अधिक होणार आहे.  

तरुण शेतकऱ्यांचा सहभाग
नांदेड - नांदेड येथील मातोश्री प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटशेतीतून शेतकऱ्यांना शेतीचे आधुनिक तंत्र कळणार आहे. गटशेतीचा हा प्रयोग शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविणारा आहे, अशा प्रतिक्रिया सहभागी शेतकऱ्यांनी दिल्या. यात लागवडीपासून ते उत्पन्न काढण्यापर्यंत आणि मालाची बाजारपेठ व पॅकेजिंगचे प्रशिक्षण मिळणार असल्याने शेतीला पुन्हा चांगले दिवस येतील, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Agriculture Income Direction Devendra Fadnavis